जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…या शहरात शिवजयंती उत्साहात होणार!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शासकीय शिवजयंती अत्यंत उत्साहात,शिस्तबद्ध  वातावरणात साजरी करण्यात येणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम,विचार आणि राष्ट्रनिष्ठेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

पराग संधान,नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

“दरम्यान शिवजयंतीच्या दिवशी सायंकाळी नागरिकांच्या सहभागातून कार्यक्रमांची मालिका सादर केली जाणार आहे.या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाच्या परिसरात आकर्षक सुशोभीकरण करण्यात येणार आहे.प्रकाश योजना,फुलांची सजावट तसेच स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत असून संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने नटविण्यात येणार आहे”-पराग संधान,नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

    छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस म्हणून दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर अत्यंत उत्साह आणि आदराने साजरा केला जातो.१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या महाराजांचा हा जन्मदिवस रयतेचा राजा,शौर्य,आणि सुशासनाचा सन्मान करतो.या दिवशी सार्वजनिक सुटी असते,तसेच भव्य रॅली,सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाराजांच्या प्रतिमेची पूजा केली जाते.कोपरगाव शहरातही शिवजयंतीच्या दिवशी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारक परिसरात पारंपरिक पद्धतीने शिवाभिषेक व शिवजन्म सोहळा संपन्न होणार आहे.यानंतर शिवरायांच्या कार्याला अभिवादन करणारे विविध प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

   दरम्यान या दिवशी सायंकाळी नागरिकांच्या सहभागातून कार्यक्रमांची मालिका सादर केली जाणार आहे.या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाच्या परिसरात आकर्षक सुशोभीकरण करण्यात येणार आहे.प्रकाश योजना,फुलांची सजावट तसेच स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत असून संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने नटविण्यात येणार आहे. कोपरगाव शहरातील नागरिकांना अभिमान वाटावा अशी शिस्तबद्ध शिवजयंती साजरी करण्याचा नगरपरिषदेचा संकल्प असल्याचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी स्पष्ट केले आहे.

  छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य,सुशासन,शौर्य,सामाजिक न्याय आणि लोककल्याणाचे प्रतीक आहेत.त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन समाजात एकोपा,राष्ट्रभक्ती व कर्तव्यभावना वाढीस लागावी,हाच या शासकीय शिवजयंती सोहळ्याचा उद्देश आहे.या शासकीय शिवजयंती सोहळ्यासाठी कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने शेवटी करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close