जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली,तीन आरोपी फरार !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
 
    कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव हद्दीत ब्राम्हणनाल्यानजिक आज पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस पथक गस्त घालत असताना त्यांना एक संशयित सिव्हर रंगाची होंडा सिटी गाडी आढळून आली असून त्या सोबत चेतन महेश पिंपळे (वय-२५) रा.गोसावीवाडा नाशिक यासह पाच आरोपी आढळून आले असून त्यांचेवर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनास्थळावरून आरोपी मात्र फरार झाले आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 

जवळके या ठिकाणी शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज पहाटे ०४ वाजेच्या सुमारास माजी उपसरपंच डी.के.थोरात यांच्या मालकीचे अनिल क्लॉथ सेंटर हे कापड दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांना आतील कुलूप उघडले नाही त्यानंतर त्यानी त्याच गावात वावी रोडला भूषण जालिंदर कोल्हे यांच्या मालकीचे कौसल्या हार्डवेअर आदी दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र पाहिल्यात ते अयशस्वी झाले तर दुसरे फोडताना दुकानदार जागा झाल्याने पळून जावे लागले आहे.

  कोपरगाव तालुक्यात चोऱ्या वाढल्या असून शहरात सचिन वॉच हे घड्याळाचे दुकान फोडून जवळपास तीस लाखांचा ऐवज लंपास केला होता.काकडी विमानतळ या ठिकाणी तीन जणांचे खून झाले होते.त्यास एक महिला उलटला नाही तोच आज जवळके या ठिकाणी शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज पहाटे ०४ वाजेच्या सुमारास माजी उपसरपंच डी.के.थोरात यांच्या मालकीचे अनिल क्लॉथ सेंटर हे कापड दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांना आतील कुलूप उघडले नाही त्यानंतर त्यानी त्याच गावात वावी रोडला भूषण जालिंदर कोल्हे यांच्या मालकीचे कौसल्या हार्डवेअर आदी दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र पाहिल्यात ते अयशस्वी झाले तर दुसरे फोडताना दुकानदार जागा झाल्याने त्यांना पळून जावे लागले आहे.

  

सुरेगाव येथील चोरट्यांनी पोलिसांना पाहताच त्या ठिकाणाहून पळ काढला होता.त्याठिकाणी त्यांना चेतन पिंपळे व त्यांचा भाऊ नंदू पिंपळे या दोघांना जेरबंद केले आहे.त्यांना पोलिसी हिसका दाखवला असता त्यांनी अन्य आरोपींची पोपटासारखी अन्य तीन आरोपींची नावे सांगितली आहेत.

  दरम्यान आज पहाटे तालुक्याच्या पश्चिम बाजूस सुमारे १८ किमी अंतरावर असलेल्या सुरेगाव हद्दीत आज पहाटे तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे आपल्या सहकाऱ्यांसह आपली गस्त घालत असताना त्यांना एक संशयित सिल्व्हर रंगाची होंडा सिटी कार (क्रमांक एम.एच.०३ ए.डब्ल्यू.२४२९) ब्राम्हणनाल्याजवळ आढळून आली होती.त्या ठिकाणी पोलिसांनी आपला मोर्चा वळवला असता सदर चोरट्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला होता.त्याठिकाणी त्यांना चेतन पिंपळे व त्यांचा भाऊ नंदू पिंपळे या दोघांना जेरबंद केले आहे.त्यांना पॉलिसी हिसका दाखवला असता त्यांनी अन्य आरोपींची पोपटासारखी अन्य तीन आरोपींची नावे सांगितली आहेत.दरम्यान या ठिकाणी पोलिसांनी त्या गाडीची झडती घेतली असता त्यांना त्यात कोयता,दोन कटर,लोखंडी पाईप,प्लॅस्टिकची एक ३.९ फुटाची लांब नळी असा ०३ लाख १० हजारांचा ऐवज आढळून आला असून पोलिसांनी तो जप्त केला आहे.

   दरम्यान या ठिकाणी पोलिसांनी कसून शोध घेतला यात आरोपी चेतन पिंपळे सह नंदू राजू पिंपळे,(वय-२२) रा.मोतीनगर सुरेगाव,विक्की सावळीराम काळे,रा.शहजापुर,संदीप दादा काळे,रा.सुरेगाव,दत्तू जानु पिंपळे रा.मोतीनगर सुरेगाव आदी पाच जण त्यात सामील असल्याची माहिती हाती आली आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदीप कोळी,पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी आदींनी भेट दिली आहे.

    या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी पो.कॉ.अविनाश अशोक तमनर (वय-३२) यांनी गुन्हा क्रं.१९९/२०२५ भारतीय न्याय संहिता सन-२०२३चे कलम ३१०(४), प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करीत आहेत.कोपरगाव तालुका पोलिसांच्या या दक्षतेचे तालुक्यात कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close