जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
ग्रामविकास

…या ग्रामपंचायतींची,’सौरग्राम’कडे वाटचाल !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत फेब्रुवारी २०२४ मध्ये नवीन,’रुप टॉप सोलर योजने’ची घोषणा केली असून यात कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीने यात पुढाकार घेऊन जवळके ग्रामपंचायतने आपल्या गावातील घरांवर सौर पत्रे बसविण्याचा निर्णय घेतला असून यात सर्व प्रथम नवनाथ पन्हाळे,एस.के.थोरात आणि सिद्धार्थ जवरे,उत्तमराव थोरात यांच्या घरावर बसवून त्याचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत केले असून त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.

  

“सदर योजना गावात सर्वत्र राबविण्यास शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे मार्गदर्शन लाभत असून सदर योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्याचे आश्वासन दिले आहे.त्याच सोबत सदर योजना राबविण्यासाठी पुणे येथील,’स्वयंऊर्जा रिन्यूएबल एनर्जी प्रा.ली.’व संभाजीनगर येथील ‘ऑसीलेशन एनर्जी प्रा.ली.’या कंपन्यांचे सहकार्य लाभत आहे मात्र सरकारने या योजनेला अनुदान वाढविण्याची गरज आहे”-सारिका विजय थोरात,सरपंच,जवळके ग्रामपंचायत,ता.कोपरगाव.

  देशात सौरऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.आता घर बांधणीच्या कर्जासोबतच रुफटॉप सोलर पॅनेल बसवण्यासाठी बँकाही ग्राहकांना निधी उपलब्ध करुन देत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी या नवीन रूप टॉप सोलर योजनेची घोषणा केली.या योजनेच्या माध्यमातून ०१ कोटी लोकांना घरांमध्ये सौरऊर्जा देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे जाहीर केले होते.

   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचे उद्दिष्ट ०१ कोटी लोकांच्या घरांमध्ये सौरऊर्जेद्वारे प्रकाश देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.यामुळं ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळण्याची सुविधाही उपलब्ध झाली आहे.या प्रकल्पात ७५ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे.या योजनेत सरकार ग्राहकांना छतावर बसविण्यात येणाऱ्या १०० युनिटसाठी ३० हजार तर १०० युनिटसाठी ६० हजार तर ३०० युनिटसाठी सरकार ७८ हजार अनुदान देत आहे.त्यासाठी सर्व घरांवर सौर पॅनल बसविण्यासाठी ग्रामपंचायतीने पत्रकार नानासाहेब जवरे,एस.के.थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेतला असून त्यात सरपंच सारिका विजय थोरात,सर्व सदस्य आदी योगदान देत आहे.त्यामुळे एस.के.थोरात,उत्तमराव थोरात,नवनाथ पन्हाळे आदींनी आपल्या घरावर सोलर बसवले असून त्यांना आपले वीज बिल शून्यावर आणण्यास मदत होणार आहे.

  दरम्यान छतावर सौर संचाचे काम पूर्ण झाल्यावर त्याचे उद्घाटन नुकतेच एस.के.थोरात यांचे हस्ते करण्यात आले आहे.

   सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,जवळके ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच डी.के.थोरात,विजय थोरात,भिवराज शिंदे,दत्तात्रय थोरात,राजेंद्र थोरात,ताराबाई थोरात,सुधीर पा.थोरात,सिद्धार्थ जवरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

   सदर प्रसंगी पुणे येथील,’स्वयंऊर्जा’चे व्यवस्थापक विजय कुंभार व व्यंकटेश शिंदे यांनी संबधित कागदपत्रे लाभधारक जवरे यांना सुपूर्त केले आहे.
दरम्यान अन्य ग्रामस्थांनी रूप टॉप योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच सारिका विजय थोरात यांनी केले आहे.

   दरम्यान सदर योजना गावात सर्वत्र राबविण्यास शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे मार्गदर्शन लाभत असून सदर योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्यासाठी त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.त्याच सोबत सदर योजना राबविण्यासाठी पुणे येथील,’स्वयंऊर्जा रिन्यूएबल एनर्जी प्रा.ली.’व संभाजीनगर येथील ‘ऑसीलेशन एनर्जी प्रा.ली.’या कंपन्यांचे सहकार्य लाभत आहे मात्र सरकारने या योजनेला अनुदान वाढविण्याची गरज असून या योजनेत सरकारने कर्ज देण्याचे आदेश देऊनही सरकारी बँका या योजनेला कर्ज देण्यास का-कू करत असल्याची नाराजी सरपंच सारिका विजय थोरात यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close