जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

माजी आ.कोल्हे माय लेकांनी निधी दिला नाहीच; पण पळविला-आरोप

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)


          
विकासनिधी देतांना कुठलाही दुजाभाव नको.एका युवा नेत्याने आम्हाला जाणीवपूर्वक विकासनिधी दिला जात नाही-दुजाभाव केला जातो हा आरोप करत शिर्डी येथे आंदोलन केले यावर माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची ही तिखट पण वास्तववादी प्रतिक्रिया आली आहे.

“कोपरगावच्या नागरिकांनी आपल्याला नगराध्यक्षपदी निवडून दिले या रागातून आ.कोल्हे यांनी कोपरगाव नगरपरिषदेला एकही रुपया निधी मिळू दिला नाही.त्याउलट आपण  प्रयत्नपूर्वक मिळविलेला ०२ कोटी रु.निधीही (विशेष रस्ता अनुदान) त्यांनी पदाचा गैरवापर करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळविला म्हणून त्या विषयात मला उच्च न्यायालयातही जावे लागलेहोते”-विजय वहाडणे, माजी नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.


    त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,”याच युवा नेत्याच्या मातोश्री तालुक्याच्या आमदार होत्या.आपण २०१६ ला कोपरगाव शहराचा लोकनियुक्त नगराध्यक्ष झालो होतो.कोपरगावच्या नागरिकांनी आपल्याला नगराध्यक्षपदी निवडून दिले या रागातून आ.कोल्हे यांनी कोपरगाव नगरपरिषदेला एकही रुपया निधी मिळू दिला नाही.त्याउलट आपण  प्रयत्नपूर्वक मिळविलेला ०२ कोटी रु.निधीही (विशेष रस्ता अनुदान) त्यांनी पदाचा गैरवापर करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळविला म्हणून त्या विषयात मला उच्च न्यायालयातही जावे लागले. नागरिकांना,”लई बॅट-बॅट करत होते” ही,उपरोधिक शेरेबाजी त्यांचे युवराज व मातोश्री एवढ्या लवकर विसरतील असे वाटले नव्हते.जे पेरले तेच उगवते हा निसर्गाचा नियम कदाचित या माय लेकांना माहिती नसावा.आपण तत्कालीन ना.विनोद तावडे यांना भेटून बंदिस्त नाट्यगृहासाठी ०२ कोटी रुपयांचा निधी आणला.पण त्यासाठी प्रयत्न करूनही जागा उपलब्ध झाली नाही.वापर न झालेला तो निधी परत जाऊ नये यासाठी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आपण तो ०२ कोटी रुपये निधी नगर परिषद कार्यालय बांधकामासाठी वापरण्याची परवानगी मिळविली.कोपरगाव शहराला विकासनिधी मिळावा यासाठी आपण माझ्या सहकाऱ्यांसोबत वारंवार न चुकता मुंबईला जाऊन मंत्रालयात प्रयत्न
प्रयत्न करायचो.पण या महाशयांनी आणि त्यांच्या मतोश्रींनी पदाचा गैरवापर करून सातत्याने अडथळे आणले.आपले दोन वर्षे कोरोना लाटेत वाया गेले.तरीही आपण इतरांपेक्षा जास्त विकासकामे केली असा दावा करून त्याबाबत तशी पुस्तिका प्रसिध्द केली असल्याचे आपल्या पत्रकात म्हटले आहे.

५३ वर्ष जुनी झालेलीनिळवंडेची पुंगी वाजवून
मतदारांना नादी लावले असल्याचा वास्तववादी टोला लगावून पण त्याचे पुढे काय झाले ? हे सर्व शहरास आणि तालुक्यास माहिती असल्याची कोपरखिळी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी लगावून नेमक्या वेळी हिशेब चुकता केला आहे.


    
दरम्यान कोपरगाव नगरपरिषदेच्या २८ विकासकामांना न्यायालयातून स्थगिती आणणारेच आज विकास निधीसाठी आंदोलन करताहेत हा मोठा राजकीय विनोद मानला जाईल.कोल्हे गटाचे सर्व नगरसेवक,स्वतः आमदार कोल्हे व संजीवनीचेअनेक दूत यांनी मला सातत्याने अडथळेच आणले.माझे सहकारी विनायक गायकवाड यांच्या जागेबाबतचा कायदेशीर ठराव कोल्हे गटाने बहुमताच्या जोरावर मंजुरच होऊ दिला नाही.  यांच्या भाटांनी “भैय्यासाहेबांना” भेटून घ्या ठराव मंजूर करू” अशी भाषा वापरली.
त्यांनी स्वतःच्या प्रभागातील विकासकामे व्हावीत म्हणून तरी ठराव मंजूर होऊ दिले हे जनतेचे नशीबच म्हणावे लागेल.
आपल्याला नगरपरिषद कारभारात अडथळे आणले नसते तर २०१९ मध्ये भाजपाचा एक आमदार नक्कीच वाढला असता असा दावा केला आहे.
         मात्र २०१९ मध्ये आ.आशुतोष काळे आमदार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात विकासनिधी मिळाला हे मान्यच करावे लागेल.हा मजकूर वाचून आम्हीच निधी आणला होता असाही दावा ते करणारच.कारण सगळ्या जगाचे कल्याण होईल इतकी निवेदने-पत्र संजीवनीच्या यंत्रणेने देऊनच ठेवलेली असणार ही चलाखी तालुक्याला नवी नाही.५० वर्षपासून व तीन पिढ्या परिचित आहे.कुठलेही काम मंजूर झाले कि लगेच जुनेच निवेदन प्रसिध्द करून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करायचा,नको त्या श्रेयवादाची फ्लेक्स प्रसिद्ध करायची ही स्वतःला चलाख समजणारी मंडळी नेहमीच करतात हे जनतेला चांगलेच माहित आहे.
      आपण नगराध्यक्ष झाल्यानंतर माजी आ.कोल्हे कोपरगाव नगरपरिषदेस किती निधी दिला व आ.आशुतोष काळे यांनी किती रुपये विकासनिधी मिळवून दिला हे दोघांनीही जाहीर केले तर जनतेलाही सत्य काय ते कळेल असा दावा करून आ.काळे यांचा गौरव केला आहे.
आपली कार्यकाळात पाच क्रमांकाचा साठवण तलाव काम सुरू झाले व आ.आशुतोष काळे यांच्यामुळेच भरघोस निधी मिळाला व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचेमुळेच औद्योगिक वसाहत मंजूर झाली हे तर जगजाहीरच आहे.मग माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी तुमचे असे कोणते ठोस काम आहे हेही सांगितले तर बरे होईल असे आवाहन केले आहे व शेवटी निळवंडेची पुंगी वाजवून
मतदारांना नादी लावले असल्याचा वास्तववादी टोला लगावून पण त्याचे पुढे काय झाले ? हे सर्व शहरास आणि तालुक्यास माहिती असल्याची कोपरखिळी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी लगावून नेमक्या वेळी हिशेब चुकता केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close