जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

धर्मग्रंथ चोरी करताना आरोपी रंगेहात पकडला,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील धर्मग्रंथांची विटंबना केल्याचा आरोपी सहा महिने होऊनही अद्याप अटक नसताना काल दुपारी ०२ वाजेच्या सुमारास येवला तालुक्यातील बोकटे येथील आरोपी सुनील अरुण दाभाडे (वय-२४) व नवनाथ या दोघांच्या विरुद्ध खडकी येथील मस्जिदी मधील मुस्लिम समाजाचा ग्रंथ चोरी करण्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला असल्याने कोपरगाव शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव (खडकी )येथील मस्जिदीमधून पवित्र ग्रंथ चोरी झाला आहे ते ठिकाण.

  

यातील आरोपी सुनील दाभाडे हा खडकी येथील मस्जिदीच्या मागील रहिवासी असलेले फिर्यादी अरबाज शाकिर शेख यांचे घरी दुपारी पेन मागण्यासाठी गेला होता.मात्र त्याच्या संशयास्पद हालचाली वाटल्याने त्यांनी पिशवीची झाडाझडती घेतली असता त्यात मुस्लिम धर्माचा पवित्र ग्रंथ,’मुंतखब अहादिस’ आढळून आला होता.

महाराष्ट्रातील अ.नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील ग्रामपंचायत हद्दीत दि.१० ऑगष्ट २०२३ रोजी रात्री १२ नंतर ते सकाळी ०६ पूर्वी अज्ञात इसमाने धार्मिक ठिकाणी प्रवेश करत तेथे ठेवलेले सुमारे ८-१० धार्मिक ग्रंथातील ७-८ ग्रंथ फाडून त्याची पाने अन्यत्र विखरून टाकली असल्याची घटना उघड झाली होती त्यामुळे त्या घटनेचा नगर जिल्ह्यात सर्वत्र निषेध व्यक्त केला होता.तर काही संघटनानीं कोपरगाव तहसिल कार्यालयावर मोर्चा काढुन आरोपीस अटक करण्याची मागणी केली होती.त्याचे पडसाद नगर जिल्ह्यासह राज्यात उमटले होते.सदर गुन्हयात आरोपी अद्याप अटक केली नसताना दि.१४ जानेवारी रोजी दुपारी ०२-०३ वाजेच्या सुमारास अशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.यातील आरोपी सुनील दाभाडे हा त्याच्या अन्य एक सहकाऱ्याबरोबर खडकी येथील मस्जिदीच्या मागील रहिवासी असलेले फिर्यादी अरबाज शाकिर शेख (वय-२२) यांचे घरी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास पेन मागण्यासाठी गेला होता.मात्र त्याच्या संशयास्पद हालचाली असल्याने व त्याचा त्यांना संशय आल्याने त्यांनी त्याच्या पिशवीची झाडाझडती घेतली असता त्यात मुस्लिम धर्माचा पवित्र ग्रंथ,’मुंतखब अहादिस’ आढळून आला होता.त्याची विचारपूस केली असता त्याने संबंधितांना उडवाउडवीची उत्तरे दिली होती.त्यामुळे फिर्यादी इसम यांचा संशय बळावला होता.याबाबत त्यांनी  त्यास ताब्यात घेऊन त्यास खडकी येतील मस्जिदचे विश्वस्त अली युनूस अन्सारी,चांदखान सरदारखान पठाण,सलीम नबाब पठाण,सलीम नवाब पठाण युनूस मस्तान हसेख आदींसह कोपरगाव शहर पोलिसांना दिली होती.त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्यास अटक केली आहे.व त्याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

घटनेनंतर खडकी येथील मस्जिदी बाहेर जमा झालेली नागरिकांची गर्दी दिसत आहे.

   

दरम्यान आरोपीने हि चोरी का केली हे अद्याप निष्पन्न झालेले नाही.व त्याने आणखी काही चोऱ्या केल्या आहेत का हि चौकशी सुरु आहे. त्याबाबत कोपरगाव शहर पोलीस तपास करत असून शहरातील नागरिक घटनेवर लक्ष ठेवून आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,पोलीस उपनिरीक्षक आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे.

दरम्यान आरोपीने हि चोरी का केली हे अद्याप निष्पन्न झालेले नाही.व त्याने आणखी काही चोऱ्या केल्या आहेत का हि चौकशी सुरु आहे. त्याबाबत कोपरगाव शहर पोलीस तपास करत असून शहरातील नागरिक घटनेवर लक्ष ठेवून आहे.

    या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.१०/२०२४ भा.द.वि.कलम सह कलम-२९५,३७९,५०४,५०६,३४  प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस अधिकारी प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close