धार्मिक
…या शाळेत आषाढ वारीचे उत्साहात आयोजन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आषाढी एकादशी निमित्त कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये संस्थेच्या सचिव चैताली काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दरवर्षी दिंडी मोठ्या उत्साहात काढण्यात आली आहे येते.
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात.हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो.या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात.हिलाच आषाढी वारी म्हणतात.हा उत्सव गौतमनगर येथे गौतम पब्लिक स्कूल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून पालखी दिंडी काढली.लहानग्या कलाकारांनी पांडूरंगाच्या भक्तीत तल्लीन होवुन भक्तीगित आविश्कार सादर केला.त्यानंतर सजवलेल्या पालखीतील प्रतिमेचे पूजन शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्राचार्य नूर शेख म्हणाले की,”दिंडी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे.विद्यार्थ्यांना उच्च दर्जाची गुणवत्ता देण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये एकता,समता,बंधुता अशी धर्मिक व सामाजिक नैतिक मूल्य विद्यार्थी दशेत रूजविणे काळाची गरज आहे.त्यामुळे आपण आपल्या सण रूढी,परंपरा जपल्या पाहिजे असे प्रतिपादन केले.यावेळी सजवलेल्या पालखीचे प्रस्थान टाळ,मृदुंग व विठ्ठल नामाच्या गजरात शाळेपासून परिसरातील मारूती मंदिराकडे झाले. या दिंडीत शाळेच्या ११०० वारकरी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक-कर्मचारी यांच्या ताफ्यासह सहभाग घेतला होता.
पालखी मंदिरात विठ्ठल नामाचा गजर करत पोहचताच सर्व बाल वारक-यांनी विठ्ठल-रखुमाईचे भक्तिभावाने दर्शन घेतले.वारक-यांचे भव्य रिगंण बनवुन त्यामध्ये अश्वप्रदक्षिणा पार पडली. झेंडेकरी व मेंढयांच्या भव्य रिंगणाने भक्तीमय वातावरणात विठ्ठलाच्या नामघोषात आसमंत दुमदुमुन गेला होता.अभ्यास,खेळ व सुसंस्कार करण्याच्या दृष्टीने गौतम पब्लिक स्कूलमध्ये आयोजित केलेल्या या दिंडीचे संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अशोक काळे,विश्वस्त आ.आशुतोष काळे,उपाध्यक्ष छबुराव आव्हाड,सचिव चैताली काळे,सहसचिव स्नेहलता शिंदे सर्व संस्था सदस्य,गांवकरी व पालकांनी कौतुक केले आहे.
सदर दिंडी सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी युरोकिड्स विभागाच्या प्रमुख विमल राठी,शाळेच्या पर्यवेक्षिका ज्योती शेलार,सुनिता कुलकर्णी,कार्यक्रम प्रमुख कला शिक्षक गोरक्षनाथ चव्हाण,रेखा जाधव,ओम गोसावी,फिजीकल डायरेक्टर सुधाकर निलक त्यांचे सहकारी रमेश पटारे सर्व शिक्षक आदींनी विषेश परिश्रम घेतले.