गुन्हे विषयक
विवाहित महिला मुलीसह,अन्य तरुणही गायब,कोपरगावात नोंद

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेली महिला सविता नारायण खुरसने हि दि.२८ सप्टेंबर रोजी आपल्या सहा वर्षीय लहान मुलीसह गायब झाल्याची खबर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून दि.२२ सप्टेंबर रोजी मढी खुर्द येथील एक तरुण ऋषिकेश बाबासाहेब वाघमारे हा गायब झाला आहे त्यामुळे दोन स्वतंत्र घटना असून एक शहर पोलीस ठाण्याच्या तर दुसरी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. त्यामुळे टाकळीसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दि.२८ सप्टेंबर रोजी ११ वाजता घरात काही किरकोळ कारणावरून वाद झाले होते.त्यात ती रागावून.” मी येवला येथे दवाखान्यात जात असल्या”चे सांगून रुसून गेली आहे.तिच्या सोबत तिची लहान मुलगी आहे.तिच्या अंगात काळी नक्षीची साडी,ब्लाउज असून सोबत लहान कन्या आहे.ती सडपातळ,रंग निंमगोरा,केस काळे,नाक,कान सरळ आहे.तर मढी खुर्द येथील तरुण ऋषिकेश वाघमारे हाही गायब झाला आहे.या दोन स्वतंत्र घटना आहेत.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”श्रावण भगवंता वाघ (वय-६५) हे टाकळी येथील रहिवासी असून ते आपल्या कुटुंबासमवेत राहतात.त्यांना सविता खुरसने (वय-२७) नावाची एक कन्या असून ती विवाहित आहे मात्र ती सासरी राहत नसून आपल्या वडिलांच्या घरीच रहात आहे.दरम्यान तिला एक सहा वर्षीय श्रावणी नावाची मुलगी आहे.
दि.२८ सप्टेंबर रोजी ११ वाजता घरात काही किरकोळ कारणावरून वाद झाले होते.त्यात ती रागावून.” मी येवला येथे दवाखान्यात जात असल्या”चे सांगून रुसून गेली आहे.तिच्या सोबत तिची लहान मुलगी आहे.तिच्या अंगात काळी नक्षीची साडी,ब्लाउज असून सोबत लहान कन्या आहे.ती सडपातळ,रंग निंमगोरा,केस काळे,नाक,कान सरळ आहे.याबाबत श्रावण वाघ यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मुलगी हरविल्याची तक्रार क्रं.६२/२०२२ प्रमाणे नोंदवली आहे.कोणाला आढळल्यास कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खबर द्यावी असे आवाहन कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी केले आहे.
दरम्यान कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द शिवारातील एक तरुण ऋषिकेश बाबासाहेब वाघमारे (वय-२५) हा दि.२२ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजता मढी फाटा येथून जेवण करून येतो असे सांगून निघून गेला व अद्याप पर्यंत परत आला नाही तो मध्यम,रंगाने गोरा,चेहरा उभट,केस काळे,कपडे लाल रंगाचा टी शर्ट काळे जर्किन,काळ्या रंगाची नाईट पॅन्ट,पायात सॅंडल अशा वेशात आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात ठरविले असल्याच्या दप्तरी नोंद क्रं.५०/२०२२ प्रमाणे नोंदणी केली आहे.याबाबत सदर तरुण हा कोणाला आढळला तर कोपरगाव तालुका पोलिसांत संपर्क करावा असे आवाहन कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी केले आहे.