गुन्हे विषयक
चाकूने मारहाण,कोपरगावात दोघांवर गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी हद्दीतील नगदवाडी येथील रहिवासी असलेले फिर्यादी यांना वैजापूर तालुक्यातील रास्ते सुरेगाव येथील आरोपी गणेश मोरे,सचिन साताळकर (दोघांचे पूर्ण नाव माहिती नाही)आदींनी फिर्यादीचे घरासमोर येऊन आमचे दाजी अनिल लांडगे यांचेशी का भांडला ? असा जाबसाल करून हातातील चाकूने मारहाण करून फिर्यादिस दुखापत केली आहे.तर दुसऱ्या आरोपीने लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे.या प्रकरणी फिर्यादी राहुल सोपान लांडगे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे सोनेवाडीसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सोनेवाडी येथील फिर्यादी व आरोपी यांच्या मेहुण्याचे काही कारणावरून वादविवाद झाले होते.त्यावरून आरोपीनी दि.३ सप्टेंबर रोजी सकाळी फिर्यादीचे वडील हे आपल्या अंगणात घरकाम करत असताना तेथे जाऊन त्यांच्या वडिलांना म्हणाले की,”आमचे दाजी अनिल लांडगे यांचेशी तुम्ही का भांडला ? असा जाबसाल करून आरोपी गणेश मोरे याने त्याच्या हातातील चाकूने वार करून फिर्यादीस जखमी केले तर दुसऱ्या आरोपीने त्यांच्या वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी इसम हे नगदीवाडी सोनेवाडी येथील रहिवासी असून त्यांचे व आरोपी यांच्यात त्यांच्या मेहुण्यावरून वादविवाद आहेत.आरोपी हे त्यांच्या मेहुण्याशी संबंधित आहेत.यापूर्वी फिर्यादी व आरोपी यांच्या मेहुण्याचे काही कारणावरून वादविवाद झाले होते.त्यावरून आरोपीनी दि.३ सप्टेंबर रोजी सकाळी फिर्यादीचे वडील हे आपल्या अंगणात घरकाम करत असताना तेथे जाऊन त्यांच्या वडिलांना म्हणाले की,”आमचे दाजी अनिल लांडगे यांचेशी तुम्ही का भांडला ? असा जाबसाल करून आरोपी गणेश मोरे याने त्याच्या हातातील चाकूने वार करून फिर्यादीस जखमी केले आहे.
दरम्यान दुसरा आरोपी सचिन सातळकर याने हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादिस मारहाण केली आहे.दरम्यान हि मारामारी पाहून जवळच असलेल्या फिर्यादीच्या वडिलांनी सोडवासोडवी केली असता आरोपीनी त्यांनाही शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण करून दमदाटी केली आहे.त्यामुळे फिर्यादी राहुल लांडगे याने त्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३४२/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे दोनही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,सहाय्यक फौजदार अमर गवसने यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शना खाली सहाय्यक फौजदारगवसने हे करीत आहेत.