जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अवैध दारू विक्रीसाठी तडजोड,दोन अधिकारी जेरबंद,कोपरगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव शिवारात अवैध दारू विक्री व वाहतूक चालू ठेवण्यासाठी ३५ हजारांच्या लाचेची मागणी करुन तडजोड अंती तेवढीच रक्कम स्वीकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दोन दुय्यम निरीक्षक अनुक्रमे राजेंद्र भास्कर कदम (वय-४६) व नंदू चिंधु परते (वय-४२) या दोन अधिकाऱ्यांना धारणगाव-कुंभारी रोडलगत एकलव्य किरणा दुकानांचे पाठीमागे भिंतीचे आडोशाला दि.२९ जून रोजी सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

फिर्यादीकडे रकमेची मागणी केल्यावर मधल्या काळात फिर्यादीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता.त्या नंतर सदर विभागाने या आरोपीना पकडण्यासाठी सापळा लावला असता दि.२९ जून रोजी दुपारी ६.४५ वाजेच्या सुमारास आरोपी क्रमांक एक राजेंद्र भास्कर कदम हा रुपये ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात आढळून आला होता.त्यानुसार नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक नरेंद्र पवार यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात काल मध्यरात्री गुन्हा दाखल केला आहे.

सदरचे सविस्तर वृत असे की,”भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम-१९४७ मध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या संस्थान समितीच्या (१९६४) शिफारशींच्या आधारावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम-१९८८ संमत करण्यात आला.०९ सप्टेंबर १९८८ पासून सुरू करण्यात आली.भ्रष्टाचाराशी संबंधित कायद्याचे संहितीकरण आणि सुधारणा घडवून आणणे हा या कायद्याचा उद्देश आहे.त्यासाठी विविध विभागीय पातळीवर अधिकारी नेमण्यात आले असले तरी या अधिकाऱ्यांकडून नागरिकांची अधिकारी आणि प्रशासन यांचेकडून होणारी पिळवणूक थांबावी हा उद्देश आहे.तीच बाब दारू उत्पादन शुल्क विभागाची आहे मात्र काही अधिकारी याला अपवाद ठरत असून नागरिकांच्या अवैध व्यवसायाला प्रतिबंध करण्याऐवजी आपल्या आर्थिक लाभासाठी ‘त्या’ अवैध व्यावसायिकांनाच मदत करत प्रोत्साहन करत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.त्या-त्या परिसरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अवैध व व्यावसायिकांना प्रतिबंध करण्याऐवजी कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारीच आपल्या आर्थिक लाभासाठी व हात ओले करण्यासाठी जर अवैध व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना छळू लागले तर ? असाच प्रसंग कोपरगाव तालुक्यात घडला असून सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या एका फिर्यादी इसमाकडून त्याच्या बंधूंचा अवैध दारू व्यवसाय आणि त्याची वहातूक सुरळीत राहावी यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोपरगाव येथील सहाय्यक दुय्यम निबंधक निरीक्षक कार्यालय बाभळेश्वर ता.राहाता येथील राजेंद्र भास्कर कदम (वय-४६) व नंदू चिंधु परते (वय-४२) आदींनी ३५ हजार रुपयांची मागणी केली होती.मात्र तडजोडी पोटी हि तेवढीच रक्कम घेण्याचे ठरले मात्र यातील फिर्यादी हा चतुर निघाला असून त्याने या मागणी नंतर लाचलुचपत विभागाच्या नाशिक येथील अधिकाऱ्यांना याची खबर दिली होती.त्यातून हे महाभारत घडले आहे.

दि.२६ मे रोजी फिर्यादीच्या भावाची इंडिका कार (क्रं.एम.एच.१५ बी.डी.९५३३) द्वारे सुरेगाव येथून देशी दारूचे बॉक्स घेऊन जाताना आढळून आला होता.त्यावेळी या अधिकाऱ्यांनी त्यास अडवून त्याचे विरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेत वापरली गेलेली इंडिका कार हि जप्त करण्यात आली होती.सदर गाडी परत न्यायालयाचे आदेशाने परत मिळावी यासाठी फिर्यादी हा संबंधित अधिकाऱ्यांकडे गेले असता त्यांनी दि.२६ जून रोजी ३० हजार रुपयांची तर दुसरा अधिकारी याने ०५ हजार रुपयांची लाच मागितली होती.

दरम्यान मधल्या काळात फिर्यादीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता.त्या नंतर सदर विभागाने या आरोपीना पकडण्यासाठी सापळा लावला असता दि.२९ जून रोजी दुपारी ६.४५ वाजेच्या सुमारास आरोपी क्रमांक एक राजेंद्र भास्कर कदम हा रुपये ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात आढळून आला होता.त्यानुसार नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक नरेंद्र पवार यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात काल मध्यरात्री गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.२५५/२०२२ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन-१९८८ चे कलम ७ प्रमाणे दोन्ही अधिकारी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी भेट दिली आहे.नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे तपास अधिकारी तथा पोलीस उप-अधीक्षक नरेंद्र पवार हे करीत आहेत.

सदरची कारवाई करण्यासाठी नाशिक लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनिल कडासने,अप्पर पोलीस अधीक्षक,नारायण न्याहळदे,पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार,पोलिस निरिक्षक संदीप साळुंखे,पो.हवालदार डोंगरे,पो.ना. इंगळे,पो.नाईक नितीन कराड,चालक पो.ह.विनोद पवार यांच्या पथकाने केली आहे.सदर कारवाई मुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या या कारवाईबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close