कोपरगाव तालुका
कोपरगावात चित्रपट राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगावात चित्रपट राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न
कोपरगाव येथील एस.एस.जी.एम.महाविद्यालयामध्ये इंग्रजी विभागांतर्गत ‘इंट्रोड्युसिंग फिल्म स्टडीज इन करीकुलम’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रस्तरीय परिषदेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड.भगीरथ शिंदे हे होते.
या निमित्ताने डॉ. राहुल कांबळे आणि डॉ. अजय एस. शेखर या तज्ञांनी मार्गदर्शन केले आहे.
पदवी आणि पदवीव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये नाविन्य असणे ही काळाची गरज आहे त्यासाठी पारंपरिक साहित्य प्रकारापेक्षा आधुनिक साहित्य प्रकार अभ्यासुन विद्यार्थ्यांची आधुनिक युगासाठी जडण-घडण करणे ही महाविद्यालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दिनांक १० फेब्रुवारी २०२२ रोजी महाविद्यालयात इंग्रजी विभागाअंतर्गत ‘इंट्रोड्युसिंग फिल्म स्टडीज इन करीकुलम’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर परिषदेमध्ये डॉ.राहुल कांबळे,असोसिएट प्रोफेसर,द इंग्लिश अँड फॉरेन लैंग्वेजेस युनिव्हर्सिटी,हैदराबाद यांनी विषयाचे अनेक विविध पैलूंचे स्पष्टीकरण करून त्यातील संशोधनाच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकला तर डॉ.अजय एस.शेखर,असोसिएट प्रोफेसर,श्री शंकराचार्य संस्कृत युनिव्हर्सिटी,कलाडी,केरला यांनी पारंपारिक शिक्षण पद्धतीमधील वसाहतवाद स्पष्ट करून फिल्म अभ्यासाचे भारतीय समाजातील महत्व स्पष्ट केले.सिनेमा,समाजव्यवस्था,राजकारण, अर्थकारण,जातीव्यवस्था यांचा अंतर्गत संबंध आधोरेखित केला.बहुतेक सहभागी विद्यार्थी,प्राध्यापक व तज्ञ संशोधकांनी वेगवेगळ्या शंका विचारून आपली विषयातील आवड दर्शविली आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.सानप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.डॉ.यशवंत एम.आर.यांनी उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचा परिचय करून दिला तर डॉ.रणधीर एस.बी,उपप्राचार्य व इंग्रजी विभाग प्रमुख,आणि डॉ.वर्पे एस.डी.यांनी तांत्रिक सहाय्य केले.तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.आवारे एम.बी.यांनी केले.प्रा.दिघे एम.के.यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.