जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

ईशान्य गडावरील ‘त्या’ वावड्यावर विश्वास ठेऊ नका-इशारा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून मतदार संघातील प्रत्येक गावापर्यंत विकास पोहोचविण्यात यश मिळाले असून मतदार संघातील अनेक महत्वाच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे तर काही रस्त्यांची कामे प्रगतीपथावर मात्र काही गडावरून हि कामे आम्हीच केली असल्याच्या वावड्या ईशान्य गडावरून उठवल्या जात असून याबाबतही अशी वावंडी उठली तर आश्चर्य वाटू देऊ नका अशी टीका आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच देर्डे चांदवड येथे बोलताना केली आहे.

देर्डे फाटा ते भरवस फाटा हा २९ किलोमीटर चा रस्ता आशियायी विकास बँकेच्या माध्यमातून देखील प्रस्तावित आहे. त्याचा डीपीआर मंजूर झालेला आहे.२९ किलोमीटर पर्यत असलेल्या या रस्त्यासाठी १३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.झगडे फाटा ते वडगाव पान रस्ता देखील प्रस्तावित असून त्या रस्त्याला देखील १३० ते १५० कोटी खर्च अपेक्षित आहे.तो रस्ता देखील ११ मीटर रुंद होणार आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा मतदार संघ.

कोपरगाव तालुक्यातील रामा ७ देर्डे चांदवड फाटा ते भरवस फाटा या रस्त्याच्या प्रारंभी ५ कि.मी.रस्त्याचे २ कोटी ५० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन,१५ लक्ष निधीतून देर्डे चांदवड ते शिलेदार वस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे,१७ लक्ष निधीतून बांधण्यात येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या २ शाळा खोल्यांचे भूमिपूजन व १७ लक्ष निधीतून बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या २ खोल्यांचे लोकार्पण नुकतेच आ. काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम,संचालक सुनील शिंदे,आनंदराव चव्हाण,काकासाहेब जावळे,कारभारी आगवन,बबनराव शिलेदार,पं.स.सदस्य श्रावण आसने,रोहिदास होन,राहुल रोहमारे,राहुल जगधने,एम.टी.रोहमारे,राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा वैशाली आभाळे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकरी अभियंता प्रशांत वाकचौरे,पंचायत समिती उपअभियंता एन.जी.गायकवाड,ग्रामसेवक एस.टी.रहाणे आदींसह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की,”निवेदन देवून किंवा प्रसिद्धी पत्रक देवून कोणतीही विकासकामे होत नसतात.त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून योग्य वेळी तांत्रिक अडचणी सोडवून हि कामे मार्गी लावावी लागतात.मात्र विरोधकांकडून न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे.तांत्रिक अडचणी सोडवायच्या नाही,कोणताही पाठपुरावा करायचा नाही,एखाद्या मंत्र्याला कार्यक्रम प्रंसगी भेटायचे व गडावरून बसून हे काम आम्हीच केल्याच्या बातम्या प्रसिद्ध करायच्या अशी पद्धत सध्या सुरु आहे.माजी आ.काळे यांच्या कार्यकाळात देखील विरोधकांनी हे करून पाहिले आहे.त्यामुळे गडावर बसून हे काम आम्हीच केले असे पत्रक काढणेचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे.त्याकडे लक्ष देवू नका हे फंडे आता जुने झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close