कोपरगाव तालुका
कोपरगावात “जागतिक आदिवासी दिन” मोठ्या उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आदिवासी समाजातील प्रत्येकाने उच्च शिक्षण घेऊन समाजाचे प्रबोधन करावे व उच्च अधिकारी बनून आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा वापर देशहिता बरोबर समाजासाठी हि करावा असे आवाहन सुनील पोरे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना नुकतेच केले आहे
जगातील मूळ निवासी आदिम जमातींचे अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने ९ ऑगस्ट १९९४ या दिवशी “विश्व आदिवासी दिवस”घोषित केला.त्या वेळेपासून दरवर्षी या दिवसाच्या निमित्ताने या जमातींच्या मुलभूत सुविधा पुरविण्याकडे लक्ष वेधणे व त्या मिळवून देणे याला सुरुवात झाली आहे.कोपरगाव येथे आदिवासी संघटनेच्या वतीने हा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या कामकाजात तब्बल ५० वर्षे वाटचाल करताना जी बाब समोर आली ती धक्कादायक अशी होती.जगातील विविध देशात साधारणपणे जंगलामध्ये वास्तव्य करणाऱ्या मूळ निवासी समुहांनी पर्यावरण जपण्याचे मोलाचे कार्य केले.परंतु समाजाच्या मुख्य प्रवाहात नसल्याने या आदिम जमाती शिक्षण,आरोग्य,रोजगार या सर्वांपासून कोसो दूर राहिल्या होत्या.या मूळ निवासी आदिम जमातींचे अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने ९ ऑगस्ट १९९४ या दिवशी “विश्व आदिवासी दिवस”घोषित केला.त्यावेळेपासून दरवर्षी या दिवसाच्या निमित्ताने या जमातींच्या मुलभूत सुविधा पुरविण्याकडे लक्ष वेधणे व त्या मिळवून देणे याला सुरुवात झाली आहे.कोपरगाव येथे आदिवासी संघटनेच्या वतीने हा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्या वेळी निमित्त महापुरुषांचे प्रतिमा पूजन समाजाचे ज्येष्ठ नेते मारुती साबळे व महारुद्र चव्हाण यांचे शुभहस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी मनोहर शिंदे,भरत आगलावे,गोविंद आढळ,अशोक उंडे,शरद शिंदे,देवराम साबळे,सुनील पोरे,नंदू लांडगे,शिवाजी वळवी,श्री चौरे,सखाराम घोडे,विठ्ठल राव शेजुळ,चंद्रकांत शेजुळ,वैभव आगळे यांचेसह महिला व तरूण बहुसंख्येने उपस्थित होते.
या वेळेस जिल्हाध्यक्ष अमित आगलावे म्हणाले की,”आदिवासी समाजाने स्वराज्याच्या लढाईत बलिदान दिलेले असून स्वातंत्र्य लढ्यासाठी सुद्धा आपले समर्पण दिले आहेत.आदिवासी समाज हा निसर्गाला मानणारा असून तो कोणालाही मारक ठरलेला नाही.तरीसुद्धा स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे होऊन ही आदिवासी समाजाची म्हणावी अशी प्रगती झालेली नाही.यावेळी आदिवासी समाजाला कोपरगाव तालुक्यामध्ये आ.आशुतोष काळे यांच्या माध्यमातून खावटी अनुदान प्राप्त करून दिले.त्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.तसेच कोपरगाव तालुक्यातील चाळीस हजार पेक्षा जास्त आदिवासी समाजाला विविध वैयक्तिक व सामायिक योजना घेण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजुर अकोले या ठिकाणी जावे लागते.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजुरचा उपविभाग शिर्डी या मध्यवर्ती ठिकाणी करावा त्या साठी शासनाकडे करण्याच्या ठरावा सोबत महादेव कोळीसमाजाच्या स्वराज्यासाठी बलिदानाची साक्ष देणारे स्थान असलेल्या शिवनेरी किल्ला परिसरातील “महादेव कोळी चौथरा” व आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे जन्मगाव असलेल्या देवगाव तालुका अकोले या दोन्ही तीर्थक्षेत्राला तीर्थक्षेत्राचा “अ” दर्जा देऊन. त्याचा महाराष्ट्र शासनाने विकास करावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.अकोले येथील विल्सन डॅम अर्थात भंडारदरा धरण यास आज जागतिक आदिवासी दिन निमित्ताने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नामकरण करण्याला पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक मनोहर शिंदे यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत अशोक उंडे यांनी तर आभार गोविंद आढळ यांनी मानले आहे.