जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रेरणा फाउंडेशन चे वतीने वृक्ष वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.अशी माहिती प्रेरणा फाउंडेशन चे अध्यक्ष ॲड. मनोज बाळासाहेब कडू पा. यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

सन-१९७२ साली युनोच्या सर्वसाधारण सभेने,मानव व पर्यावरण याविषयी आयोजित केलेल्या परिषदेत, पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरविले.संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी राजकीय,औद्योगिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या पातळीवर कृतिशील सहभाग मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले.

पर्यावरणाचे आपल्याभोवती असणे आपण गृहीत धरून, गेली काही दशके, त्यातील विविध घटकांची हानी करत आलो आहोत. परंतु, पर्यावरणाचा समतोल ढासळण्याचे परिणाम दैनंदिन जीवनातही जगभर दिसू लागल्याने याबाबत जागृती करण्याची गरज उत्पन्न झाली.

१९७२ साली युनोच्या सर्वसाधारण सभेने,मानव व पर्यावरण याविषयी आयोजित केलेल्या परिषदेत, पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरविले.संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी राजकीय,औद्योगिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या पातळीवर कृतिशील सहभाग मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले. त्यानुसार शाश्वत विकासावर भर देण्यात येत आहे.पार्श्वभूमीवर हा पर्यावरण दिन कोपरगावातील प्रेरणा फाउंडेशनने आज उत्साहात साजरा केला आहे.

सदर प्रसंगी अड.कडू यांनी म्हटले आहे की,”गेल्या काही वर्षापासून बेसुमार वृक्षतोड होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला असून पर्यावरणाचा समतोल बिघडल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे.आत्ताच उदाहरण घ्यायचं झाल्यास आपण पाहिले की कोरोना आजाराच्या काळात रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता जाणवत होती,या कठीण काळातच सर्वांना ऑक्सिजनचे महत्त्व किती मोठे आहे याची जाणीव झाली.पर्यावरण संवर्धन,वृक्ष संगोपन,वृक्ष संवर्धन याचा एक भाग म्हणून लोकांना वृक्ष लागवडीची प्रेरणा मिळावी झाडांचे संगोपन करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून प्रेरणा फाउंडेशन च्या वतीने वृक्ष वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला असल्याचेही अड.कडू शेवटी म्हणाले आहे.

सदर कार्यक्रमात मोगरा,गुलाब,कुंदा आदीं फुल फळ झाडांचे वाटप करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम प्रसंगी प्रेरणा फाउंडेशन चे अध्यक्ष ॲड. मनोज बाळासाहेब कडू, उपाध्यक्ष ॲड. सौ .रश्मी कडू ,श्री.भाऊसाहेब निंबाळकर,सौ.निर्मला निकम , सौ.निता शिंदे,सौ. सोनाली शिंदे ,सौ अर्चना लाड , सौ . सुलभा देशपांडे , सौ.दिपाली नलगे, सौ.सौ.शोभा वराडे ,सौ.मंगल शंखपाळ ,सौ. विद्या घेरे ,सौ,कल्पना निंबाळकर, श्री.नंदकुमार शंखपाळ , ब्रम्हकुमारी ज्योती पवार, मुस्तफा शेख .आदीं मान्यवर सदर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close