जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

…या मंत्र्यांच्या आ.काळेंना शुभेच्छा!

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोकणातील उल्हास खोऱ्यातील व वैतरणा खोऱ्यातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी उल्हास-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्प कार्यालयाचा उद्घाटन समारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते रविवार दि.०३ रोजी सिंचन भवन नासिक येथे मंत्री व आमदारांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

 

कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यामध्ये वळविणेबाबतचा नदीजोड प्रकल्प राबविण्याचा निर्णय तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेऊन स्वतंत्र प्राधिकरण निर्माण करण्याचा निर्णय घेऊन मुख्य अभियंता पद निर्माण केले होते.मात्र अल्पावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार गेले होते.त्यानंतर शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांच्या सहकार्याने संघटनेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे,रूपेंद्र काले आदींनी उच्च न्यायालयाच्यां औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका (क्र.०५/२०२४) दाखल केली होती.त्यानंतर राज्य शासनाला या प्रकल्पास गती द्यावी लागली आहे हे विशेष !

   सदर कार्यक्रमासाठी आ.आशुतोष काळे देखील उपस्थित होते.सोमवार दि.४ रोजी आ.आशुतोष काळे यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा फलक कोपरगाव मतदार संघासह जिल्ह्यात व मुंबईत मंत्रालयासमोर कार्यकर्त्यांकडून व त्यांच्या हितचिंतकांकडून  लावण्यात आले होते.आ.आशुतोष काळे यांचा वाढदिवस असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांना देण्यात आली असल्यामुळे त्यांनी या कार्यक्रमात आ.काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय आ. आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरात स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर व तालुका कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे केले होते.

  कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यामध्ये वळविणेबाबतचा नदीजोड प्रकल्प राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.या प्रकल्पामुळे अवर्षणप्रवण गोदावरी खोऱ्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती कायमस्वरुपी दूर होण्यास मदत होणार आहे. यावेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ,अदिवासी कल्याण मंत्री नरहरी झिरवळ, क्रीडा युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे,खा.भास्करराव भगरे,आ.दिलीप बनकर,आ.डॉ.राहुल आहेर,आ.राहुल ढिकले,आ.काशिनाथ दाते, आ.विठ्ठल लंघे,आ.अमोल खताळ यांच्यासह विविध मान्यवर आदींनी  वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

साई समाधीचे दर्शन घेताना आ.आशुतोष काळे दिसत आहेत.

दरम्यान आ.काळे यांनी आज सकाळी साईबाबा मंदिरात उपस्थित राहून साई समाधीचे दर्शन घेतले आहे.त्यानंतर कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी महात्मा गांधी जिल्हा चॅरीटेबल ट्रस्ट प्रदर्शन हॉल कोपरगाव येथे उपस्थित होते.सकाळी दहा वाजल्यापासून शुभेच्छा देण्यासाठी उशिरापर्यंत हितचिंतकांनी गर्दी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close