जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सिंचन

गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ४० कोटी मंजूर-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आपल्या आयुष्याची शंभरी पूर्ण करत आलेल्या गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी राज्याच्या जलसंपदा विभागाचे मंत्री जयंत पाटील यांनी १४ कोटी रुपये मंजूर केले असून दुसऱ्या टप्यात २६ कोटी रुपये निधी मिळणार असून एकूण ४० कोटी रुपये निधी प्राप्त होणार असल्याची माहिती कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी दिली असून उर्वरित कामाला ४४ कोटी रुपये लवकरच देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

“गोदावरी कालव्याच्या पाण्याच्या भरवशावर सहकारी साखर कारखाने,छोटे-मोठे उद्योग,अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना व निफाड,कोपरगाव,शिर्डी, राहाता या मोठ्या शहरांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन अवलंबून आहे.कालवे जीर्ण झाल्यामुळे कालवे फुटून आवर्तन विस्कळीत झाल्यास त्याचा प्रतिकूल परिणाम या शहरातील नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर होत होता.त्याचा परिणाम गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेती सिंचनावर देखील होत होता या न निधीने हा प्रश्न मार्गी लागणार आहे”आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

कोपरगाव विधानसभा मतदार संघासह निफाड,शिर्डी, राहाता तालुक्यातील अनेक गावातील शेकडो हेक्टर शेती या व वैजापूर तालुक्यातील काही गावातील शेती शेतकऱ्यांचे भवितव्य गोदावरी कालव्यांवर अवलंबून असून या दोन्ही कालव्यामुळे हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली येत असून शेती सिंचनाचा भार हे कालवे ब्रिटीश काळापासून वाहत आहे.अवर्षणग्रस्त असलेल्या तालुक्यातील शेतीसाठी शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गोदावरी उजव्या व डाव्या कालव्यांची निर्मिती केली.उजवा कालवा नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्यापासून ११० किलोमीटरपर्यंत व डावा कालवा ९० किलोमीटरपर्यत वाहत आहे. १०० वर्ष झालेल्या कालव्यांमध्ये झाडे-झुडुपांचे साम्राज्य वाढलेले आहे.या गोदावरी कालव्यांवरील छोटे पूल,एस्केप बंधारे,मोऱ्यांची बांधकामे मोडकळीस आलेली असून त्यामुळे कालव्यांची वहन क्षमता कमी झाली आहे.६७७ क्युसेक्सने वाहणाऱ्या उजव्या कालव्याला धरणातून ५०० क्युसेक्स व ३७९ क्युसेक्सने वाहणाऱ्या डाव्या कालव्याला १५० क्युसेक्स पाणी जास्त होत असून अनेकवेळा हे कालवे ठिकठिकाणी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेती सिंचनावर होत असतो. या गोदावरी कालव्याच्या पाण्याच्या भरवशावर सहकारी साखर कारखाने, छोटे-मोठे उद्योग,अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना व निफाड, कोपरगाव,शिर्डी, राहाता या मोठ्या शहरांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन अवलंबून आहे.कालवे जीर्ण झाल्यामुळे कालवे फुटून आवर्तन विस्कळीत झाल्यास त्याचा परिणाम या शहरातील नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर होत होता.त्याचा परिणाम गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेती सिंचनावर देखील होत होता.हि बाब आ. काळे यांनी गांभीर्याने घेवून या गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळविण्यासाठी सातत्याने जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला होता.त्या पाठपुराव्याला अपेक्षित यश मिळत असून २६ कोटी रुपये गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी दिले आहेत.जीवघेण्या कोरोना संकटात विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देतांना अडचणी येत असतांना देखील निधी मिळाला हि लाभधारक शेतकऱ्यांच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे.या निधीतून कालव्यांची वहनक्षमता वाढविण्यासाठी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी हा निधी वापरण्यात येणार असून अजूनही निधी मिळविण्यासाठी आपले प्रयत्न यापुढेही सुरूच राहणार असून पिण्याचे पाणी,शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. काळे यांनी शेवटी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close