जाहिरात-9423439946
सहकार

कोपरगावातील…या पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ९९.४७ टक्के ठेवीदारांच्या १८ लाख रुपयापर्यंतच्या ठेवी,’लिक्विडीटी बेस्ड प्रोटेक्शन फंड’ अंतर्गत सुरक्षित आहेत व उर्वरित ठेवेदारांच्या ठेवीदेखील सुरक्षित कर्ज वाटपामुळे सुरक्षित असून सभासदांच्या विश्वासमुळेच संस्थेचे नाव आज उंचावले असल्याचे प्रतिपादन समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी कोपरगाव येथिल एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

सदर प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कोयटे यांची आशियाई पतसंस्था फेडरेशनच्या ३६ देशांचे नेतृत्व करणाऱ्या एशियन कॉन्फिडरेशन क्रेडिट ऑफ युनियन (ॲक्यू) वर संचालक आणि खजिनदार पदी निवड झाल्याबद्दल उपस्थित सभासदांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.

राज्याच्या सहकारी पतसंस्थेच्या चळवळीत अग्रणी असलेल्या समता पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात आज दुपारी संपन्न झाली आहे त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्वेता अजमेरे,गुलाबचंद अग्रवाल,जितेंद्र शहा,अरविंद पटेल,रामचंद्र बागरेचा,चांगदेव शिरोडे,संदीप कोयटे,गुलशन होडे,निरव रावलिया,कचरू मोकळ,राजकुमार बंब,बाबासाहेब जंगम,सरव्यवस्थापक सचिन भट्टड,ज्येष्ठ सभासद चांगदेव वक्ते,माधव वहाडणे,दिपक इंगळे,नरेंद्र ललवाणी,नंदकिशोर परदेशी आदी मान्यवरांसह बहुसंख्य सभासद उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”समता पतसंस्थेने आतापर्यंत २५ टक्के पासून ५० टक्के पर्यंत लाभांश सभासदांना दिलेला आहे.त्यामुळे सभासदांनी आपले अधिकाधिक गुंतवणूक संस्थेच्या भागभांडवलामध्ये करावी.या प्रसंगी सभासदांना १२ लाभांश जाहीर केला आहे.

सदर प्रसंगी संस्थेचे संचालक संदीप कोयटे म्हणाले की,”संस्थेच्या ठेवी ७१० कोटी ८९ लाख रुपयापर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत तर कर्ज वाटप ५४७ कोटी ८८ लाख रुपये पर्यंत आहे.या कर्जापैकी ४० टक्के म्हणजे २१५ कोटी कर्ज हे सोनेतारण कर्ज आहे.सोनेतारण कर्जात कोणत्याही प्रकारचा अपहार होऊ नये यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सोनेतारण कर्ज वाटप १०० टक्के सुरक्षित केले आहे.त्यामुळे कर्ज वसुलीमध्ये देखील समता पतसंस्था राज्यात अव्वल आहे.समता पतसंस्थेमध्ये अत्युच्च तंत्रज्ञानाचा वापर तसेच उच्च दर्जाची ग्राहक सेवा देऊन ठेवीदार व कर्जदारांमध्ये समता पतसंस्थेने आकर्षण निर्माण केले आहे.

सत्काराला उत्तर देताना काका कोयटे म्हणाले की,”समता पतसंस्थेने १ वर्षांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे समता पतसंस्थेची सक्सेस स्टोरी दाखविली होती.समताची ‘यश’ कथेचा आणि पतसंस्था चळवळीतील योगदानाचा अभ्यास केला आणि आशिया खंडातील सर्व देश माझ्या कामावर प्रभावित झाले आणि माझी निवड लोकशाही पद्धतीने झाली.हे यश संस्थेच्या सर्व सभासदांना समर्पित करतो.

सदर प्रसंगी प्रास्तविक सरव्यस्थापक सचिन भट्टड यांनी केले आहे.संस्थेचे ज्येष्ठ सभासद चांगदेव वक्ते,माधव वहाडणे,दिपक इंगळे,नरेंद्र ललवाणी, नंदकिशोर परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले.उपस्थितांचे स्वागत संस्थेचे जेष्ठ संचालक अरविंद पटेल यांनी केले तर सभेचे सुत्रसंचालन व आभार भट्टड यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close