जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

…या संस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीची ५३ वी वार्षिक  सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन माजीआ.अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली गौतम पब्लिक स्कूलच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात सपंन्न झाली आहे.

  

“संस्थेचा शैक्षणिक उद्देश लक्षात घेता संलग्न शाखांकडुन नफा न कमवता ज्ञानदानाचे कार्य करणे हा असून संस्थेचे संस्थापक कर्मवीर शंकरराव काळे याचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न चालु ठेवण्याचा संस्थेचा मानस आहे”- आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

   महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ मधील कलम ७५(१) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे,सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सहकार वर्ष समाप्त झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी किंवा तत्पूर्वी घेणे बंधनकारक आहे.त्यानुसार कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीची ५३ वी वार्षिक  सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

   सदर प्रसंगी व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड,कारभारी आगवण,सचिव चैताली काळे,सिकंदर पटेल,भास्करराव आवारे,बाबासाहेब कोते,उत्तम औताडे,राधु कोळपे,दिलीप चांदगुडे,सुनील बोरा,मधुकर बडवर,रामराव गवळी,डॉ.चंद्रशेखर आव्हाड,अशोक मुरलीधर काळे,मच्छिंद्र रोहमारे,मच्छिंद्र देशमुख,तसेच गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख,सुशीलामाई काळे महाविद्यायाच्या प्राचार्या डॉ.विजया गुरसळ,गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिटयुटचे प्राचार्य सुभाष भारती,न्यू इंग्लिश स्कूल देर्डे चांदवड व काकडीचे मुख्याध्यापक प्रकाश देशमुख,बाळासाहेब गुडघे व सभासद उपस्थित होते.

सदर प्रसंगी अध्यक्षीय पदाची सूचना अशोक मुरलीधर काळे यांनी मांडली सदर सूचनेस ज्ञानदेव मांजरे यांनी अनुमोदन दिले.संस्थेचे सभासद मच्छिंद्र रोहमारे यांनी दिवंगत झालेले सभासद, मान्यवर,हितचिंतक,कर्मचारी यांच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडला.विषय पत्रिकेप्रमाणे सभेच्या कामकाजास सुरूवात होवून विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.

            संस्थेचे विश्वस्त तसेच कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे म्हणाले की,”संस्थेचा शैक्षणिक उद्देश लक्षात घेता संलग्न शाखांकडुन नफा न कमवता ज्ञानदानाचे कार्य करणे हा संस्थेचे संस्थापक कर्मवीर शंकरराव काळे याचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न चालु ठेवण्याचा संस्थेचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या संलग्न शखांच्या नवीन इमारतीचे कामकाज सुरू असून शासनाच्या येत्या काळात बदलत्या शैक्षणिक धोरणाचा विचार करता आपल्या शैक्षणिक संस्थेतही बदल करणे आवश्यक असुन त्याकरिता  संस्थेमार्फत प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सदर प्रसंगी संस्थेचे वरिष्ठ लिपिक केशव दळवी यांनी अहवाल वाचन केले तर विश्वस्त कारभारी आगवण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close