जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

…या पतसंस्थेचे कार्य पतसंस्था सहकार चळवळीला पोषक-प्रांताधिकारी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा


शिर्डी-(प्रतिनिधी)


एखादी पतसंस्था अविरतपणे २८ वर्षे पतसंस्था चालवत ठेवीदार कर्जदार सभासद यांच्या विश्वासाच्या जोरावर १३० कोटी रुपयांच्या असलेल्या ठेवी पतसंस्थेच्या सर्व संचालक मंडळाच्या पारदर्शक कामाचे प्रतिक असल्याचे सांगत पतसंस्थेची वाटचाल पतसंस्था चळवळीला पाठबळ देणारी असल्याचे प्रतिपादन शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

शिर्डी येथील श्री साई अरिहंत पतसंस्थेच्या माध्यमातून कोकमठाण येथील गोशाळेसाठी ३१ हजाराचा धनादेश देताना प्रांताधिकारी माणिक आहेर,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके,अध्यक्ष सतिश गंगवाल,उपाध्यक्ष संजय संकलेचा,कमलाकर कोते,राजेंद्र जगताप आदी मान्यवर दिसत आहे.

“कोव्हीडच्या प्रतिकूल काळात शिर्डीत साई मंदिर बंद असताना परिसरातील अर्थकारण अडचणीत असताना पतसंस्थेने संकटावर मात केली.त्या काळात सरकारी दवाखाने,सहकारी संस्था,अनाथाश्रम आदींना मास्क सॅनेटरी,ऑक्सिजन मशीन,शैक्षणिक धार्मिक सामाजिक व वैद्यकीय कामासाठी देखील पतसंस्थेच्या माध्यमातून मदत करण्यात आली आहे”-सतिष गंगवाल,अध्यक्ष,श्री साई अरिहंत नागरी सहकारी पतसंस्था शिर्डी.

शिर्डी शहरातील श्री साई अरिहंत नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सतीश गंगवाल हे होते.

सदर प्रसंगी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके उपाध्यक्ष संजय संकलेचा,उद्योजक किशोर गंगवाल,कमलाकर कोते,सतीश वैजापूरकर,वकील अविनाश बोठे,उद्योजक दिपक निकम,संचालक मुकुंद मयूर,महेंद्र कोटस्थाने,मंगेश गंगवाल तसेच सर्जेराव कांबळे प्रवीण पटेल,दत्तात्रय वाळुज, वकील बाळासाहेब कोते,ज्ञानेश्वर पवार,संदीप पारख,बाळासाहेब व्यवहारे,अमित जैन,घनश्याम दोडिया,ललित गंगवाल,रामनाथ गव्हाणे,प्रमोद गोंदकर,गोपीनाथ गोंदकर,भरत विसपुते,सचिन कोते आदी सह विविध मान्यवर उपस्थित होते.

  सदर प्रसंगी प्रास्तविक व अहवाल वाचन तज्ञ संचालक राजेंद्र जगताप यांनी केले ते म्हणाले की पतसंस्थेकडे १३० कोटी रुपयांच्या ठेवी असून शंभर कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले असून ४० कोटी रुपयांची सुरक्षित गुंतवणूक केली असून एक कोटी ४० लाखाचा नफा झाला आहे कर्ज वितरण करताना खात्रीशीर कर्जदार जामीनदार योग्य ती कागदपत्राची पूर्तता करून परिसरातील व्यावसायिक व्यापारी बेरोजगार यांना पाठबळ देण्यात आले आहे.

     यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते कोकमठाण येथील गोशाळेसाठी ३१ हजार येथील कनकुरी येथील संतसेना मंदिर उभारणीसाठी ११ हजार तर सर्प मित्र संदीप खिरे यांना पाच हजार,मिराबाई बोरसे यांना वैद्यकीय कामासाठी पाच हजार अशी ५५ हजाराची मदत जाहीर करण्यात आली आहे.

   यावेळी बोलताना अध्यक्ष गंगवाल यांनी सांगितले की,”कोव्हीड  काळात शिर्डीत साई मंदिर बंद असताना परिसरातील अर्थकारण अडचणीत आले असताना ठेवीदारांच्या विश्वासाच्या जोरावर पतसंस्थेने संकटावर मात केली त्या काळात सरकारी दवाखाने हॉस्पिटल सहकारी संस्था अनाथाश्रम यांना मास्क सॅनेटरी,ऑक्सिजन मशीन,शैक्षणिक धार्मिक सामाजिक व वैद्यकीय कामासाठी देखील पतसंस्थेच्या माध्यमातून मदत करण्यात आली  आहे.या पुढील काळात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगून कर्जदारांनी कर्ज भरून पतसंस्थेला सहकार्य करावे असे आवाहन शेवटी केले आहे.

यावेळी संचालक किशोर गंगवाल यांनी सूत्रसंचालन केले तर संस्थेचे व्यवस्थापक गोरक्ष दिघे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close