जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

…या संकुलाचा शुभारंभ उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाने येथील स्टेशन रस्त्यावर नव्याने उभारलेल्या भव्य अशा व्यापारी संकुलात श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करून अनेक संत महंतांच्या उपस्थितीत शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे.

कोपरगांव बेट येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे महंत रमेशगिरी महाराज,संवत्सर येथील महानुभाव आश्रमाचे महंत राजधरबाबा,विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाचे महंत परमानंद महाराज यांच्या हस्ते प्रारंभी दहिहंडी फोडून व्यापारी संकुलामधील शुशोभिकरणाचे विधीवत उद्घाटन करण्यात आले आहे.

“कोपरगाव तालुक्यात दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून नामदेवराव परजणे यांनी तालुक्यातीलच नव्हे तर आसपासच्या तालुक्यातील शेतकरी वर्गासाठी उपजिविकेचे मोठे साधन निर्माण केलेले आहे.आज हजारो लोकांना गोदावरीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे”-रमेशगिरी महाराज,कोपरगाव बेट.

सदर प्रसंगी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे बायफचे राज्य विभागीय संचालक व्ही.बी.दयासा,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,कैलास ठोळे,अॅड. वाल्मिक काजळे,दत्तू कोल्हे,गणेश आढाव,अजित कोरके,सुरेश बोळीज,किरण रासकर,आर्किटेक्ट प्रकाश निकम,नानासाहेब सिनगर,अरुण येवले,संजय होन,डॉ.मुळे,डॉ.प्रकाश पहाडे,राजेंद्र शिरोडे,योगेश जोबनपुत्रा,कोपरगांव बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम,उपसभापती गोवर्धन परजणे,संचालक खंडू फेपाळे,रामदास केकाण,राजेंद्र निकोले,साहेबराव लामखडे,प्रकाश गोर्डे,लक्ष्मणराव परजणे,सोमनाथ निरगुडे,गोदावारी दूध संघाचे उपाध्यक्ष गोपीनाथ केदार,विवेक परजणे,उत्तम डांगे,सुभाष होन,जगदीप रोहमारे,नानासाहेब काळवाघे,भाऊसाहेब कदम,संजय दुपके,गोरक्षनाथ शिंदे,सुदाम शिंदे,कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश परजणे यांनी केले आहे.तर महंत रमेशगिरीजी महाराज,राजधरबाबा,परमानंदजी महाराज यांनीही नवीन व्यापारी संकुलासाठी शुभेच्छा व्यक्त करून आशीर्वादपर संदेश व्यक्त केले.बायफ संस्थेने सुरु केलेल्या किसान मार्ट या दुकानाचेही यावेळी संत महंतांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close