जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

शरद पवार पतसंस्थेच्या सभासदांना…इतका लाभांश देणार-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोळपेवाडी येथील डॉ.शरदचंद्र पवार पतसंस्थेने दरवर्षी १५ टक्के लाभांश देण्याची सुरु ठेवलेली परंपरा याहीवर्षी अबाधित ठेवली असल्याची माहिती कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.         

  

दि.३१ मार्च अखेर संस्थेकडे ३६ कोटी ५१ लाखाच्या ठेवी होत्या यामध्ये सातत्याने वाढ सुरुच असून आज अखेर ३७ कोटीच्या ठेवी आहेत.अहवाल सालात संस्थेने २६ कोटी ८४ लाख कर्ज वाटप केलेले आहे.संस्थेचे थकबाकीचे प्रमाण २.३९% आहे.संस्थेने एन.पी.ए.तरतूद रुपये ७ कोटी ३२ लाख ६४ हजारांची केली आहे.१००% एन.पी.ए.ची तरतूद केल्यामुळे निव्वळ एन.पी.ए. ०% आहे.

पद्मविभूषण डॉ.शरदचंद्र पवार नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०२२-२३ या वर्षाची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गौतम बँकेच्या गौतमनगर येथील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात व माजी आ.अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यावेळी ते बोलत होते.सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र रोहमारे हे होते.

सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे,संचालक सचिन चांदगुडे, डॉ.मच्छिंद्र बर्डे,सुनील मांजरे,सुभाष आभाळे,श्रीराम राजेभोसले,शिवाजी घुले,मनोज जगझाप,शंकरराव चव्हाण, श्रावण आसने,गौतम बँकेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कोते,माजी संचालक नारायणराव मांजरे,वसंतराव दंडवते, बाबुराव कोल्हे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे,पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुन काळे,शरद पवार पतसंस्थेचे उपाध्यक्ष रावसाहेब चौधरी, गौतम बँकेचे उपाध्यक्ष बापूराव जावळे,प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे,प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड,कुक्कुट पालनचे उपाध्यक्ष विजय कुलकर्णी,कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”डॉ.शरदचंद्र पवार नागरी सहकारी पतसंस्था कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह व गौतमनगर परिसरातील छोटे मोठे व्यावसायिक,व्यापारी तसेच ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक अडचण सोडविण्यासाठी आधारस्तंभ बनली आहे.याहीवर्षी सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवली हि कौतुकास्पद बाब आहे.संस्थेने संपादन केलेल्या विश्वासाच्या बळावर ठेवींमध्ये सातत्याने होणारी वाढ ठेवीदारांचा विश्वास वृद्धिंगत होत असल्याचे प्रतिक आहे.ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवून नियमित व वेळेवर कर्ज पुरवठा करणे व त्याची नियमित कर्ज वसुली करून ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवी मागणी प्रमाणे तत्काळ परत करीत आहे.त्यामुळे संस्थेच्या ठेवीत भविष्यात सातत्याने वाढ होणार असून संस्थेवर कर्जदार,ठेवीदार यांचा दृढविश्वास असल्याचे सिद्ध होत आहे.यापुढील काळातही संस्थेने अशीच आर्थिक शिस्तीची जपवणूक करून नियोजनबध्द कारभार करून संस्थेची आर्थिक भरभराट साध्य करावी असे आवाहन आ.काळे यांनी शेवटी केले आहे.

दि.३१ मार्च अखेर संस्थेकडे ३६ कोटी ५१ लाखाच्या ठेवी होत्या यामध्ये सातत्याने वाढ सुरुच असून आज अखेर ३७ कोटीच्या ठेवी आहेत.अहवाल सालात संस्थेने २६ कोटी ८४ लाख कर्ज वाटप केलेले आहे.संस्थेचे थकबाकीचे प्रमाण २.३९% आहे.संस्थेने एन.पी.ए.तरतूद रुपये ७ कोटी ३२ लाख ६४ हजारांची केली आहे.१००% एन.पी.ए.ची तरतूद केल्यामुळे निव्वळ एन.पी.ए. ०% आहे. सहकार कायद्यानुसार २२ कोटी ५९ लाखाची गुंतवणूक केली असून लेखा परीक्षण अहवालानुसार संस्थेला ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला असून ८१ लाख १५ हजार रुपयांचा नफा झाला आहे.

सदर प्रसंगी अहवाल वाचन संस्थेचे व्यवस्थापक मंगेश देशमुख यांनी केले.यावेळी सर्व विषय सभासदांनी एकमताने टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले आहे.उपस्थितांचे आभार सुधाकर दंडवते यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close