सहकार
…या कारखान्याच्या विकासासाठी अनुभवी तज्ज्ञांची गरज-प्रतिपादन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीची प्रक्रिया आता संपली असून कारखाना संचालक मंडळ कामाला लागले आहे,परंतु कारखान्यात कामगारांची कमतरता भासत आहे त्यामुळे कारखान्याच्या विकासासाठी अनुभवी व जाणकारांची मोठ्या प्रमाणात गरज असून त्यांना प्राचारण करण्यात येत असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते डॉ एकनाथ गोंदकर यांनी नुकतेच आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले आहे .
“कारखान्याच्या विकासाला आता सुरवात होत आहे,त्यामुळे आता आम्ही कारखान्याविषयी अनुभवी तसेच जाणकार यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावणी करत आहे,काहींचे सहकार्य कारखान्यास लागणार आहे.सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी काम करावे अशी विनंतीही त्यांनी केली.कारखाना सुरू करण्यासंदर्भात चर्चा करून योग्य ते मार्गदर्शन करून पुढील कार्यवाहीसाठी आदेश देण्यात आले आहे”-डॉ.एकनाथ गोंदकर,अध्यक्ष,राहाता तालुका काँग्रेस.
शुक्रवारी कामगारांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात कर्मचाऱ्याशी संवाद साधताना ते बोलत होते.यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे यांनी शेतकऱ्यांना उसाच्या नोंदणीचे आव्हान करत आता तीन लाख टन ऊस गळीताचे उद्दिष्ट्ये ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे डॉ.गोंदकर म्हणाले की,”कारखान्याच्या विकासाला आता सुरवात होत आहे,त्यामुळे आता आम्ही कारखान्याविषयी अनुभवी तसेच जाणकार यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावणी करत आहे,काहींचे सहकार्य कारखान्यास लागणार आहे.सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी काम करावे अशी विनंतीही त्यांनी केली.कारखाना सुरू करण्यासंदर्भात चर्चा करून योग्य ते मार्गदर्शन करून पुढील कार्यवाहीसाठी आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान गणेश सहकारी कारखान्यातील पुरवठा विभागातील कर्मचारी दत्तात्रय बावके,नारायण वाकचौरे,रावसाहेब शेळके या कर्मचाऱ्यांना कामावर कायम थांबण्याची विनंती डॉ.गोंदकर व इतर संचालकांनी केल्यामुळे त्यांनी कामावर राहण्याचे मान्य केले आहे.त्यामुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहेत.
यावेळी गणेश कारखाण्याचे अध्यक्ष सुधीर लहारे,उपाध्यक्ष विजय दंडवते,संचालक अनिल गाढवे,मधुकर सातव,चिटणीस नितीन भोसले,संगमनेरचे कार्यकारी संचालक घोगरकर,संजीवनी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री दिवटे तसेच अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.