जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सण-उत्सव

कोपरगावात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरालगत असलेल्या जेऊर पाटोदा शिवारात चंद्रलिलानगर येथील श्री रेणुका माता मंदिर परिसरात श्री बालेश्वर महादेव,श्री गणेश श्री पंचमुखी हनुमान,पार्वती माता,श्री रेणुका माता मुर्ती स्थापना व कलशारोहण समारंभ श्री संत जनार्दन स्वामी समाधिस्थान येथील महंत रमेशगिरीजी महाराज श्री दत्तगिरीजी महाराज यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

गेले दोन दिवस ग्राम प्रदक्षिणा पुजन वास्तुपुजन शांती पाठ होमहवन ईतर धार्मिक विधी वेदशास्त्रसंपन्न पुरोहितांनी केले अभियंता अनिल चंद्रभान भाबड सुनील भाबड आणि भाबड परीवाराने आयोजन केले होते.या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत संतपुजन करण्यात येऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर प्रसंगी आशीर्वादपर मार्गदर्शन करताना महंत रमेशगिरी महाराज म्हणाले की,”माणसाच्या आयुष्यात धार्मिक अधिष्ठान महत्वाचे आहे. माणसाच्या मुखात रसवंती असावी देवाचे नामस्मरण संकटातून सुटका करते माणसाच्या हातून दानधर्म होणे गरजेचे आहे. भाबड परीवाराने केलेली देवभक्ती वाखाणण्याजोगी आहे हाच वारसा चालवला जावा संतांचे आशीर्वाद संपन्नता वाढविण्यासाठी उपयुक्त असतात.
कलशारोहण व प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला त्या वेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close