जाहिरात-9423439946
सण-उत्सव

कोपरगाव तालुक्यात..या बाबांचा जंगी यात्रा उत्सव

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील श्री क्षेत्र संवत्सर येथील श्री रामसिंग बाबा यांची जंगी यात्रा महोत्सव शनिवार दि.३० एप्रिल रोजी संपन्न होत असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.त्यासाठी जय्यद तयारी सुरु आहे.

सदर प्रसंगी दुपारी ०३ वाजता जनार्दन स्वामी महाराज कोपरगाव बेट येथील महंत रमेशगीरी महाराज हे सदिच्छा भेट देणार आहेत.तर दुपारी ०३.३० वाजता १०१ दिवसात पायी नर्मदा परिक्रमा करणारे ह.भ.प.वाल्मिक महाराज जाधव रामवाडीकर यांचे जाहीर हरी कीर्तन संपन्न होणार आहे.या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ नजीकच्या भाविकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

या यात्रा उत्सवानिमित्ताने सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे.या शिवाय सकाळी ०७ वाजता श्रींना गंगास्नान घालण्यात येणार आहे.तर सकाळी ०८ वाजता श्री सत्यनारायण महापुंजा करण्यात येणार आहे.दुपारी ०३ वाजता जनार्दन स्वामी महाराज कोपरगाव बेट येथील महंत रमेशगीरी महाराज हे सदिच्छा भेट देणार आहेत.तर दुपारी ०३.३० वाजता १०१ दिवसात पायी नर्मदा परिक्रमा करणारे ह.भ.प.वाल्मिक महाराज जाधव रामवाडीकर यांचे जाहीर हरी कीर्तन संपन्न होणार आहे.

दरम्यान दुपारी उपस्थित राहणाऱ्या भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप होणार आहे.त्याचा लाभ संवत्सर,कान्हेगाव,भोजडे,वारी,भोजडे,दहिगाव बोलका,कोकमठाण येथील भाविकांनी घ्यावा असे आवाहन संवत्सर येथील श्री रामशिंग बाबा भक्त मंडळाने शेवटी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close