सण-उत्सव
कोपरगावात राजश्री छत्रपती शाहु महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत थोर समाजसुधारक राजश्री छत्रपती शाहु महाराज यांची जयंती नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.
छत्रपती शाहू महाराज यांनी विद्यार्थिदशेत त्यांनी इंग्रजी,संस्कृत,इतिहास,राज्यशास्त्र इ.विषयांचा अभ्यास केला.त्यांना राज्याधिकार (२ एप्रिल १८९४) प्राप्त झाला.त्यांनी अनेक कलाकार,संगीततज्ञ,मल्ल,चित्रकार आदींना आश्रय दिला होता.जातीव्यवस्था मोडून काढण्यासाठी त्यांनी मोठा प्रयत्न केला होता.ब्रम्ह वृंदाचा विरोध मोडून काढला होता.मागासवर्गीयांना त्यांनी पन्नास टक्के आरक्षण जाहीर केले होते.
कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक.प्राथमिक शिक्षण,जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला.त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव.चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले (१७ मार्च १८८४). राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले.सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले.विद्यार्थिदशेत त्यांनी इंग्रजी,संस्कृत,इतिहास,राज्यशास्त्र इ.विषयांचा अभ्यास केला.त्यांना राज्याधिकार (२ एप्रिल १८९४) प्राप्त झाला.त्यांनी अनेक कलाकार,संगीततज्ञ,मल्ल,चित्रकार आदींना आश्रय दिला होता.जातीव्यवस्था मोडून काढण्यासाठी त्यांनी मोठा प्रयत्न केला होता.ब्रम्ह वृंदाचा विरोध मोडून काढला होता.
श्री.गो.विदयालयात राजश्री धत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांच्या हस्ते झाले.
या वेळी विदयालयाचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,कोपरगांव एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी समाजसुधारक शाहु महाराज यांना अभिवादन केले.
विदयालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.जाधव ई.एल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.विद्यालयाचे कला शिक्षक ए.बी.अमृतकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.जेष्ठ शिक्षक ए.जे कोताडे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला पाटील आर.ई.डी.गायकवाड आर.बी.,व्ही.तुपसैंदर,एन.के.बडजाते,चौधरी आर.जे,शिरसाळे एस.एन,आदी शिक्षक,शिक्षिका सुरक्षित अंतर पाळुन उपस्थित होते.