विशेष दिन
कोपरगावातील…या महाविद्यालयात पोषण आहार सप्ताह संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह १ ते ७ सप्टेंबरराष्ट्रीय स्तरावर संपूर्ण भारतात साजरा केला जातो. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेजमध्ये या राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यात वेगवेगळे कार्यक्रम घेऊन हा सप्ताह साजरा करण्यात आला.

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी विविध पदार्थ बनवलेले दिसत आहे.सोबत शिक्षक वर्ग व प्राचार्य ईरशाद अली आदी दिसत आहे
आहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत, त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. आरोग्य आणि आहाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी भारत सरकारतर्फे दरवर्षी १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो.
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कोपरगाव येथील नामवंत एम.के.आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्वच्छता,कुपोषण व अपघात या विषयावर एक नाटिका सादर करून जनजागृती केली.तसेच त्यांची मोफत आरोग्य तपासणी केली.नर्सिंग कॉलेजचे शिक्षक व एम.के.आढाव विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र रामराव वानखेडे यांनी उपस्थित लावून नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य केले.तसेच एम.के.आढाव विद्यालयाचे उप प्राचार्य,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी ही मोलाचे सहकार्य करत उपस्थिती दर्शवली.
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेज मध्ये विविध आजारांवरील रुग्णास काय आहार द्यावा त्यांचे विविध पदार्थ बनवून प्रदर्शन भरवले यासाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य इरशाद अली यांनी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व कॉलेजचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.