जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

कोपरगाव शहरात योगदिन उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मुंबई-नागपूर महामार्गालगत लगत असणाऱ्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाविद्यालयात नुकताच ‘आंतरराष्ट्रीय योगादीन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

‘योग’आपल्या जीवनासाठी महत्वाचं आहे.निरोगी आयुष्यासाठी योगासन अतिशय महत्वाचं आहे. योगाचे फायदे खूप आहेत.२१ जून हा दिवस जगभरात “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून साजरा केला जातो.योगाचे महत्त्व ओळखून जगातील सर्व देश योग दिन साजरा करतात.

२०१४ साली ११ डिसेंबरला संयुक्त राष्ट्र संघानं योगाचं महत्व मान्य करत २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती.२१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्याने आणि सूर्याचं दक्षिणायन सुरु होण्याचा हा काळ असल्यानं या संक्रमण काळात योगाचा जास्त फायदा पोहोचतो म्हणून २१ जूनची निवड या दिवसासाठी करण्यात आली असून कोपरगाव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाविद्यालयासह जगभर तो मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

मंगळवार २१ जून रोजी सकाळी ६ ते ७ या वेळेत होमिओपॅथी,आयुर्वेदा,फिजोथेरपी,नर्सिंग या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पाचशेपेक्षा बहुसंख्येने सहभाग घेतला.या नंतर ७ ते ८ या वेळेत सूर्यनमस्कार स्पर्धा घेण्यात आली. यात २२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक पर्णवी खडतकर,व्दितीय क्रमांक विभा रायबातकर,तृतीय क्रमांक उरुसा शेख,मुलांमध्ये अम्रान तांबोळी प्रथम क्रमांक,उज्वल सोनवणे द्वितीय क्रमांक,कार्तिक जगताप तृतीय क्रमांक हे विद्यार्थी या स्पर्धेचे मानकरी ठरले.त्यानंतर सायंकाळी ०३ वाजेपासून ते ०५ वाजेपर्यंत रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या.चित्रकला स्पर्धेत मयुरी शेळके प्रथम क्रमांक,नबीता शेख द्वितीय क्रमांक,अक्षता पवार तृतीय क्रमांक,तर रांगोळी स्पर्धेत साक्षी वाघ प्रथम क्रमांक,प्रीती एकशिंगे द्वितीय क्रमांक हे या स्पर्धेचे मानकरी ठरले आहे.

यांना पारितोषिक तुळशीचे रोप देऊन सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.दरम्यान श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलमधी रुग्णांना योगासने करण्यास प्रोत्साहित करण्यात आले आहे.त्यास रुग्णांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.यावेळी होमिओपॅथी कॉलेजच्या प्राचार्या डॉ.सावनी यरणाळकर आयुर्वेदा कॉलेजचे प्राचार्य डॉ.योगेशकुमार गीते,नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य इशद अली,फिजोथेरपीचे प्राचार्य डॉ.झाकीर सय्यद,डॉ.शितलकुमार सोनवणे व सर्व कॉलेजचे शिक्षकवृंद व रुग्णालयातील कर्मचारी बहुसंखने उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close