जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

…या शहरात भगवान परशुराम जयंती उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

    कोपरगाव येथील ब्राह्मण सभेच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.या निमित्तानं कोपरगांव शहरात सायंकाळी शोभायात्रेचे आयोजन मोठ्या स्वरुपात करण्यात आले होते.यात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

  

या परशुराम जन्मोत्सव सोहळ्याच्या शोभायात्रेत विविध सामाजिक संदेशाचे फलक घेवुन समाज  प्रबोधन करण्याचा प्रयत्न झाला.त्यात पर्यावरण,पाणी बचतीचे महत्त्व,बेटी बचाव,वृक्षांचे संवर्धन आदी बाबीचा समावेश होता हे विषेश !

   भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा करताना भगवान परशुराम हे चिरंजीव असल्याचे भान ठेवून हा उत्सव साजरा करावा लागतो.वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय्य तृतीया) या दिवशी परशुरामांचा जन्म झाला असे मानले जाते.प्रदोषकाली परशुरामाची पूजा करून त्याला अर्घ्य दिले जाते.कोपरगाव शहरात ब्राह्यण सभेच्या मंगल कार्यालयात ब्राह्यण सभेने सकाळी अध्यक्ष मकरंद को-हाळकर,अनिल कंगले,सचिन महाजन,महेंद्र कुलकर्णी,अजिंक्य पदे आपल्या पत्नीसह पुजेला बसले.यांच्या हस्ते भगवान परशूरामाचे पुजन  करण्यात आले आहे.

   सायंकाळी शोभायात्रेचे सुरुवातीला सर्वाचे स्वागत ब्राह्यण सभेचे सचिव सचिन महाजन यांनी केले.संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे हस्ते भगवान परशुरामाचे पुजन करुन पालखीची सुरुवात करण्यात आली आहे.या कार्यक्रमाचे पौरोहीत्य वेदशात्र संपन्न उमेश जोशी व त्यांचे सहकारी यांनी केले आहे.

   या प्रसंगी गोदावरी दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,ऐश्वर्या सातभाई,प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक,जेष्ठ विधिज्ञ जयंत जोशी,ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मकरंद को-हाळकर,पत्रकार मनोज जोशी,सतिष कुलकर्णी आदि समाज बांधव उपस्थित होते.

    या शोभायात्रेत गावातील रेणुका माता देवीच्या मंदीरा मध्ये आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते रेणुका मातेची व भगवान परशूरामाची विधिवत पुजा करण्यात आला आहे तर दरम्यान या शोभायात्रेचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळ झाला आहे.

   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्राह्यण समाज महीला मंडळाच्या अध्यक्षा अॕड.श्रध्दा जवाद व कार्यकारिणी,उपाध्यक्ष राजेंद्र जवाद,वसंतराव ठोंबरे,डाॕ.मिलींद धारणगांवकर,संदीप देशपांडे,अजिंक्य पदे,गौरीश लव्हरीकर,योगेश कुलकर्णी,वंदना चिकटे,सदाशिव धारणगांवकर आदीनी प्रयत्न केले आहे.

   सदर ब्राह्यण सभेचे उपाध्यक्ष बी.डी.कुलकर्णी यांनी प्रास्तविक केले आहे तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन खजिनदार जयेश बडवे यांनी केले तर आभार संजीव देशपांडे व संघटक महेंद्र कुलकर्णी यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close