विशेष दिन
महात्मा फुले यांना…या ठिकाणी अभिवादन

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयात समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांची जयंती मोठ्या उत्साहात स संपन्न झाली आहे.

जोतिरावांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली.शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते.
जोतीराव गोविंदराव फुले हे महात्मा फुले नावाने लोकप्रिय होते. हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते,विचारवंत,जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते.सामाजिक प्रबोधन,अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन,आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले.महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत.जोतिरावांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली.शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते.महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे.त्यांची आज जयंती असल्याने त्यांना के.जे.सोमय्या महाविद्यालयात ती त्यांना अभिवादन करून मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.
सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य विजय ठाणगे,प्रा.संतोष पगारे,डॉ.बाबासाहेब गव्हाणे,डॉ.शैलेंद्र बनसोडे, प्रा. सदाशिव नागरे,डॉ.अभिजित नाईकवाडे,डॉ.निता शिंदे,प्रा.वर्षा आहेर आदी मान्यवर व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.त्यावेळी त्यांच्या प्रतिमेला डॉ.अभिजित नाईकवाडी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे.