जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

….या माजी खासदारांचा जयंती कार्यक्रम होणार !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
  
  तत्कालीन  कोपरगाव लोकसभा मतदार संघाचे माजी खा.स्व.कर्मवीर शंकरराव काळे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त रविवार दिनांक ६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता कर्मवीर शंकरराव काळे स्मृती-उद्यान गौतमनगर येथे व सकाळी १० वाजता पंचायत समिती कोपरगाव येथे पुष्पांजली कार्यक्रम होणार असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

       

स्व.शंकरराव देवराम काळे (सन -१९२१-२०१२) हे एक भारतीय राजकारणी होते आणि महाराष्ट्रातील अहील्यानगर जिल्ह्यातील सहकारी चळवळीतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते.ते तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते.त्यांची जयंती आगामी ०६ एप्रिल रोजी संपन्न होत आहे.

  स्व.शंकरराव देवराम काळे (सन -१९२१-२०१२) हे एक भारतीय राजकारणी होते आणि महाराष्ट्रातील अहील्यानगर जिल्ह्यातील सहकारी चळवळीतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते.ते तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते.त्यांनी १९९१ ते १९९६ पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेससाठी कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व देखील केले.त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या कल्याणासाठी काम केले.गणपतराव औताडे यांनी १९५३ मध्ये महाराष्ट्रातील अहील्यानगर जिल्ह्यातील कोळपेवाडी येथे कोपरगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेडची स्थापना केली.श्री काळे हे संस्थापक संचालक मंडळांपैकी एक होते.त्यांनी अहील्यानगर जिल्हा आणि महाराष्ट्र राज्यातही सहकारी चळवळीला वरच्या स्थानावर नेले.रयत शिक्षण संस्थेत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पश्चात मोठे काम केले होते.ते या संस्थेचे पंधरा वर्षे अध्यक्ष होते.त्यांचा जयंती सोहळा येत्या ०६ एप्रिल रोजी संपन्न होत आहे.त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

   दरम्यान या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी माजी आ.अशोक काळे,स्नेहलता शिंदे,गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे,जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे तसेच कारखान्याचे उपाध्यक्ष,संचालक मंडळ,कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे सर्व सदस्य व विविध संलग्न संस्थांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालक,पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

   या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी कर्मवीर शंकरराव काळे यांचेवर व कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाना तसेच उद्योग समुहावर प्रेम करणा-या नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कर्मवीर काळे मित्र मंडळाचे उपाध्यक्ष नारायण मांजरे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close