जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
वन व पर्यावरण

कोपरगाव तालुक्यात बिबट्याने केली शेळी फस्त !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या रवींद्र गुरु व साहेबराव देवकर यांच्या शेळी पालन गोठ्यात काल रात्री एकच्या सुमारास एका बिबट्याने एक मोठी शेळी हल्ला करून ठार मारली असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.यावेळी वन विभागाचे कर्मचारी एस.एस.गोसावी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असल्याची माहिती हाती आली आहे.

“राज्यात आढळणारे बिबटे हे बकऱ्या,गुरे व कुत्र्यांवर गुजराण करतात.कोपरगाव तालुक्यात वारंवार बिबट्या आढळत असून त्याने टाकळी शिवारात आज अपर्यंत नऊ ते दहा शेळ्या फस्त केल्या आहेत.त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त तालुका वन विभागाने करावा”-सुनील देवकर,माजी सभापती,कोपरगाव पंचायत समिती.

बिबटे चपळ शिकारी आहेत.त्यांचा जातकुळीतील इतर मार्जारांपेक्षा जरी ते आकारमानाने लहान असले तरी त्यांच्या मोठ्या कवटीमुळे त्यांना मोठ्या भक्ष्यांची शिकार करता येते.काळे बिबटे हे दाट जंगलांमधे जास्त असतात.तिथे त्यांना त्यांच्या रंगाचा फायदा होतो असे मानले जाते.भारतात काळे बिबटे प्रामुख्याने दक्षिणेकडील दाट जंगलात,आसाममध्ये व नेपाळमध्ये आढळतात.इतर मोठ्या मार्जारांपेक्षा बिबट्यांच्या खाद्यामधे जास्त वैविध्य असते व प्रांताप्रमाणे बिबट्यांच्या खाद्यामधे बदल होतो.सर्व प्रांतातील बिबट्यांचे मुख्य खाद्य म्हणजे खूर असलेले प्राणी.पण ते माकडे,उंदरांसारखे कृंतक प्राणी,सरीसृप,उभयचर,पक्षी व किडेदेखील खातात.कधीकधी ते कोल्ह्यासारखे इतर लहान शिकारी प्राणी सुद्धा खातात.राज्यात आढळणारे बिबटे हे बकऱ्या,गुरे व कुत्र्यांवर गुजराण करतात.कोपरगाव तालुक्यात वारंवार बिबट्या आढळत असून त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी कोपरगाव पंचायत समीतीचे माजी सभापती सुनील देवकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.

त्यांनी या बाबत फोनवर वन विभाग कोपरगावच्या प्रतिभा पाटील यांचेशी संपर्क साधून टाकळी गावातील या घटनेची माहिती दिली आहे.या गावात हि किमान नववी ते दहावी घटना असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली आहे व वन अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.टाकळी गावातील नऊ ते दहा शेतकऱ्यांचे दहा ते पंधरा हजाराच्या पुढे नुकसान या बिबट्याने केले तिचे देखील शासना कडुन भरपाई मिळावी त्याचप्रमाणे बिबट्याचा बंदोबस्त लवकर करावा अशी मागणी करून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.व गावात एक पिंजऱ्या ऐवजी अनेक पिंजरे लावावे अशी मागणी केली आहे.

जाहिरात-9423439946

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close