जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
लोकसभा कामकाज

शिर्डी मतदार संघातील…या रस्त्यांच्या कामासाठी लक्ष घालणार – मंत्री गडकरी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे )


        शिर्डी लोकसभा मतदार संघातील श्रीरामपूर,अकोले,संगमनेर,राहाता,तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली असून दळणवळणाचे दृष्टीने सदर  रस्त्याची कामे ही केंद्रीय निधीतून तातडीने हाती घेण्यासाठी केंद्रीय सडक परिवहन,महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी भेट घेतली असून या प्रश्नाबाबत आपण त्यांचे लक्ष वेधले असून त्यांनी सदर कामे आपण मार्गी लावू असे आश्वासन दिले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे मतदार संघातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान उत्तर भारतीयांना पुण्यास व तेथून दक्षिण भारतात जाण्यास सर्वात जवळचा ठरणारा तळेगाव दिघे मार्गे संगमनेर -कोपरगाव-उक्कडगाव (रा.मा.६५) कि.मी.२९/०० ते ३६/५०० याचा त्यात समावेश केला आहे.त्यामुळे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे निळवंडे कालवा कृती समिती,जनमंगल ग्रामविकासने,जवळके ग्रामपंचायत आदींनी अभिनंदन केले आहे.

उत्तर नगर जिल्ह्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर वाट लागली आहे.त्यात प्रामुख्याने नगर – मनमाड या महामार्गाचा समावेश होतो.शेकडो बळी घेणारा महामार्ग म्हणून याची ख्याती आहे.देशातील एकमेव असा हा महामार्ग असेल ज्याची अवस्था अगदी साध्या खडीकरणाच्या रस्त्यापेक्षाही भयंकर दयनीय आहे.भग्नावस्था झालेल्या या रस्त्याचे ग्रहण कधी सुटणार ? नगर-मनमाड महामार्ग आणि खड्डे यांचे मोठे महामार्गाचे समीकरण पूर्वीपासून जुळलेले आहे.खड्ड्यांचा महामार्ग म्हणून याची वेगळी ओळख आहे.गेल्या सन 2002 साली विलासराव देशमुख यांच्या हस्ते चार पदरी भूमिपूजन झालेल्या या रत्याची 25 वर्षांत दुर्दशा संपलेली नाही.या महामार्गावर एकाचवेळी एकाच दमात कधीही काम पूर्णत्वास कधीच गेले नाही.महामार्गाची अशीही केविलवाणी दुरवस्था असू शकते,याचे ज्वलंत उदाहरण म्हणून विशेष नोंद व्हावी अशी अनेकांची अपेक्षा आहे.विशेष बाब म्हणजे या महामार्गावर दर निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचे दावेदार उमेदवार आहेत आणि याच मार्गावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साईबाबांचे शिर्डी आणि शनी शिंगणापूर ही दोन तीर्थक्षेत्रे या रस्त्याने जोडलेली आहेत.तरीही नगरपासून कोपरगावपर्यंत या महामार्गावर केवळ खड्ड्यांचेच साम्राज्य पसरलेले आहे.रस्त्यावर खड्डे आहेत की,खड्ड्यात रस्ता हेच समजेनासे झाले.महाकाय खड्ड्यांमुळे हा रस्ता अपघातांना निमंत्रण देतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही.खड्डे हुकविताना वाहन चालकांना आणि प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.खड्ड्यांना हुलकावणी देताना नागमोडी वळणे घेत चाललेली वाहने,धुळीच्या फुफाट्याने माखलेले चेहरे,वाहनांची आदळाआपट,त्यांचे होणारे मोठे आर्थिक नुकसान,अपघात,दुखापती हे या महामार्गावरील नित्याचे चित्र बनले आहे.नव्हे हा महामार्ग असंख्य मृत्यूचा साक्षीदार बनला आहे.तरीही या महामार्गावरील व त्या परिसरातील आमदारांना यांचे काहीही सोयरसुतक वाटत नाही हे विशेष ! मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने मंत्री नितीन गडकरी नगर येथे सभेस आले असता कोपरगाव येथील तत्कालीन एका आमदाराने त्यांना खड्डे बुजविण्यासाठी निवेदन दिले होते.त्यावेळी त्या आमदाराची गडकरी यांनी जाहीर सभेत खरडपट्टी काढली होती.मात्र आता हा महामार्ग आता बदलणार असे संकेत मिळू लागले आहेत.

आता नव्याने शिर्डी लोकसभेत निवडून आलेले खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी या प्रश्र्नी लक्ष वेधले असून त्यांना समक्ष भेटून लेखी निवेदन सादर केले होते.सदर निवेदनात त्यांनी नगर -मनमाड सह श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलास जोडणारा रस्ता अंत्यंत  खराब झालेला असून रहदारी योग्य राहिलेला नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

   या खेरीज अकोले तालूक्यातील घाटघर शेंडी राजूर अकोले संगमनेर लोणी श्रीरामपूर नेवासा रस्ता (रा.म.५० ) कि.मी ३३/८०० ते ५९/९०० २) बारी- राजूर -जामगाव –कोतूळ-ब्राम्हणवाडा,-बोटा ते एन.एच.-६० रस्ता (रा.मा.-२३)किमी २३३/८७० ते २४८/२८० तालुका अकोले एन.एच.-२२२ ते तोलारखिंड कोतूळ,सावरचोल आदींचा समावेश आहे.
  तर उत्तर भारतीयांना पुण्यास व तेथून दक्षिण भारतात जाण्यास सर्वात जवळचा ठरणारा तळेगाव दिघे मार्गे संगमनेर-कोपरगाव-उक्कडगाव (रा.मा.६५) कि.मी.२९/०० ते ३६/५०० याचा त्यात समावेश केला आहे.

  अकोले तालुक्यातील अकोले जिल्हा हद्द ते बारी राजूर कोतूळ ब्राह्मणवाडा बोटा रोड (रामा२३)कि मी २४९/५०० ते २६४/००० तालुका अकोले,शहापूर-घोटी-राजूर -अकोले-संगमनेर लोणी-श्रीरामपूर-नेवासा रोड (रामा -५०) कि.मी.,९३/००० ते ९८/९०० (चौपदरीकरण) तालुका संगमनेर (संगमनेर ते वडगाव फाटा) आदींचा समावेश आहे.
  
   या शिवाय पाथरे बु –लोणी-पिंप्री निर्मळ चोळकेवाडी- वाकडी चितळी रोड (एम.डी.आर.८६)कि.मी. ७/५०० ते १३/५०० तालुका राहता (लोणी खुर्द मापरवाडी फाटा ते पिंप्री निर्मल),कोल्हार बु (एम.डी.आर.-२१ ),राजुरी गोल्हारवाडी-वाकडी -पुणतांबा रस्ता (एम.डी.आर.८७)कि.मी. ८/०० ते १७/०० तालुका राहाता ८) एम.डी.आर.-२१ ते हसनापुर-लोणी-आडगाव-केलवड- नांदुरखी ते रा.मा.८ रस्ता (एम.डी.आर.१२६ ) कि.मी. ०/०० ते ३४/४०० तालुका राहाता ( भाग आडगाव ते केलवड) आदींचा समावेश आहे.

दरम्यान  श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव व मालेवाडी सरला रस्त्यावरील गोदावरी नदीवर मोठा पूल बांधणे,एम.डी.आर. २१ ते वळदगाव अशोकनगर ते टाकळीभान रस्ता,(एम.डी.आर.)किमी ३/०० ते १७/५००  सदर रस्ते हे दळण-वळणाचे,भौगोलिक विकासाच्या  दृष्टीने  तातडीने होणे आवश्यक असल्याचे मंत्री गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिलेले होते.या प्रश्र्नी आपण  स्वत: लक्ष घालीत असल्याचे त्यांनी त्यांचे पत्र क्र.-२०९५७०२ दिनांक १० जुलै २०२४ अन्वये कळविले आहे.दरम्यान या माहितीने शिर्डी मतदार संघातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
                                
                          

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close