जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
महसूल विभाग

शेतकरी भरपाई पासून वंचित,शेतकऱ्यांची तातडीची बैठक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

सी.एन.जी.गँसपाईपलाईन व पारेषण टाँवर लाईन ज्या शेतकऱ्यांच्या शेतातुन जाऊन सुध्दा शेतकरी लाभार्थी मदतीसाठी वंचित ठेवले शेतकर्‍यांना संघटीत होऊन शनिवारी नेवासा फाटा (पाटबंधारे काँलनी) येथे शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अँड.अजित काळे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

राज्य सरकारचा मुल्यमापन विभाग जमीन अधिग्रहण करण्याच्या मोबदल्याचे मूल्यांकन करते.पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विभाग मुक्ती देतो.व संबंधित शेतकऱ्यास भरपाई दिली जाते अशी सर्वसाधारण पद्धत असताना नेवासा तालुक्यात मात्र गॅस वाहिनी व विद्युत पारेषण विभाग मात्र अपवाद ठरला असून त्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता व शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण न करताच घोडे दामटण्यास प्रारंभ केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.याबाबत शेतकरी संघटनेने प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी आवाज उठवला आहे.

सरकार सार्वजनिक प्रयोजनांसाठी जसे की रस्त्यांचे बांधकाम,सिंचन,जल व गॅस वाहिन्या,विद्युत वाहक पोल,मनोरे आदी प्रकल्पासाठी आवश्यक असलेली खाजगी जमीन घेते.खाजगी भूसंपादनासाठी प्रस्ताव विशेष भूमी अधिग्रहण अधिकारी पाठविला जातो.भूसंपादन अधिकारी प्रस्तावांचे छाननी करण्यात येते आणि बजेट तरतूद प्रमाणपत्र,प्रशासकीय मान्यता प्रमाणपत्र,तांत्रिक मंजूरी ऑर्डर यांची छाननी करण्यात येते.या प्रस्तावामध्ये तलाठी व संबंधित एजंसींनी सादर केलेल्या “लहान जमीन धारक” साठी प्रमाणपत्रे समाविष्ट आहेत.या नंतर प्रस्ताव संयुक्त मोजमाप निवड केली आहे.जमीन मालकाने त्यास सहमती दिली नसल्यास आधिकारी जमीन अधिग्रहण स्वीकारतात.जमीन मालकांच्या आक्षेपांना आमंत्रित केले आहे,आणि निराकरण केले आहे. कलम ९(१) अंतर्गत,जर चौकशीदरम्यान कोणतीही आक्षेप घेण्यात आल्यास,त्यांना एजन्सीच्या विभागीय कार्यालयाद्वारे निराकरण केले जाते.मुल्यमापन विभाग जमीन अधिग्रहण करण्याच्या मोबदल्याचे मूल्यांकन करते.पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विभाग मुक्ती देतो.व संबंधित शेतकऱ्यास भरपाई दिली जाते अशी सर्वसाधारण पद्धत असताना नेवासा तालुक्यात मात्र गॅस वाहिनी व विद्युत पारेषण विभाग मात्र अपवाद ठरला असून त्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता व शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण न करताच घोडे दामटण्यास प्रारंभ केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.याबाबत शेतकरी संघटनेने प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी आवाज उठवला असून संबधीत शेतकऱ्यास नुकसान भरपाई द्यावी यासाठी विचार मंथन करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे.
सदर बैठकीस शेतकऱ्यांनी बहु संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अड्.अजित काळे यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close