महसूल विभाग
कोतवाल १० पदांसाठी ८ ऑगस्ट रोजी आरक्षण सोडत

न्यूजसेवा
शिर्डी- (प्रतिनिधी)
कोपरगांव तालुक्यात १० कोतवाल पदाची भरती करण्यात येणार आहे .यासाठी शिर्डी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ८ ऑगस्ट रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.आरक्षण प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्याकरिता इच्छुक नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोपरगांव तहसीलदार संदिपकुमार भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
कोपरगाव तहसील कार्यालयांतर्गत कोतवाल संवर्गाची मळेगांव थडी,चासनळी,रवंदे,संवत्सर,माहेगांव देशमुख, मंजूर,कोकमठाण,चांदेकसारे,धोत्रे,करंजी बु.,येसगांव व ब्राम्हणगांव या सजेची एकूण १२ पदे रिक्त आहेत.
सदर रिक्त पदापैकी ८० टक्के मर्यादेत एकूण १० कोतवाल पदांची भरती करण्यात येणार आहे.याबाबत ८ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ४ वाजता कोपरगांव तहसील कार्यालयात प्रवर्ग निहाय आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.