जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
महसूल विभाग

“कामांचा करुनी निपटारा;चला करुया महसूल सप्ताह साजरा”

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

शिर्डी-(प्रतिनिधी)

“लोकाभिमुख कामांचा करुनी निपटारा;चला करुया महसूल सप्ताह साजरा”अशी घोषणा करत महसूल विभागाशी संबंधित सामान्य नागरिकांच्या तक्रारी तसेच अर्जावर काल मर्यादेत निपटारा होऊन सर्वसामान्य जनतेला अधिक चांगली व दर्जेदार सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने १ ऑगस्ट महसूल दिना निमित्ताने राज्यात ‘महसूल सप्ताहा’चे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली आहे.

“महसूल विभागाच्या संबंधित सामान्य नागरिकांच्या तक्रारी तसेच अर्जांवर कालमर्यादेत निपटारा होऊन जनतेला अधिक चांगली दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न सात दिवसात केला जाईल.याबरोबरच विभागाच्या वेगवेगळ्या निर्णयातून नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल”-राधाकृष्ण विखे,महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य.

या व्यापक अभियानातून विशेष मोहीमेद्वारे नागरिकांचे प्रश्न सोडवितानाच विभागाचे लोकाभिमुख काम गतीमान करण्याचा संकल्प आहे.या अभियानात प्रशासकीय अधिकारी,लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांनी सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन ही महसूलमंत्र्यांनी केले आहे.

महसूल सप्ताहाच्या नियोजनासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी,अपर जिल्हाधिकारी,नोंदणी महानिरीक्षक,जमाबंदी आयुक्त,प्रांताधिकारी यांची दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेवून महसूल सप्ताहाच्या नियोजनाचा आढावा घेतला.सप्ताहाचे आयोजन केवळ शासकीय स्वरुपाचे न करता या माध्यमातून आपल्या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा लोकांशी संवाद कसा होईल असा प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.कार्यालय स्वच्छतेपासून ते विभागातील अधिकारी-कर्मचारी यांचा सहभाग असलेले सांस्कृतिक साहित्यिक आणि सेवाभावी उपक्रम आयोजित करण्याचेही त्यांनी सूचित केले.

“लोकाभिमुख कामांचा करुनी निपटारा; चला करुया महसूल सप्ताह साजरा” या ब्रीद वाक्याने या महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.महसूल विभाग म्हणजे राज्य शासनाचे एक महत्त्वाचे अंग आहे.महसूल विभागाची नाळ ही आज तळागाळातील जनतेशी थेट जुळलेली आहे.त्यामुळे महसूल विभागाने वर्षभर केलेल्या विविध लोकाभिमुख कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी दरवर्षी १ ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून राज्यभरात साजरा करण्यात येतो.यावर्षी मात्र महसूल सप्ताह आयोजित करून या अभियानाला व्यापक स्वरूप देण्याचा निर्णय विभागाने घेतला असल्याचे स्पष्ट करून विभागाच्या माध्यमातून लोकाभिमुख उपक्रमाचे सात दिवस आयोजन केले असल्याचे सांगताना महसूलमंत्री श्री.विखे म्हणाले की,”महसूल विभागाच्या संबंधित सामान्य नागरिकांच्या तक्रारी तसेच अर्जांवर कालमर्यादेत निपटारा होऊन जनतेला अधिक चांगली दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न सात दिवसात केला जाईल.याबरोबरच विभागाच्या वेगवेगळ्या निर्णयातून नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल.

या महसूल सप्ताहामध्ये एक ऑगस्ट रोजी या सप्ताहाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असून,०२ ऑगस्ट रोजी ‘युवा संवादा’ च्या माध्यमातून महसूल विभाग महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून मार्गदर्शन करणार आहे. ०३ ऑगस्ट रोजी ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमातून गावपातळीवर सामान्य माणसाचे महसूल विभागाच्या संबधात काही प्रश्न जाणून घेवून सोडविण्यात येतील.माजी सैनिकांचे तसेच त्यांच्या कुटुबीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम ०५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येईल.महसूल विभागातील निवृत्त अधिकारी कर्मचारी त्यांचे कुटुंबीय यांना बोलावून सन्मानित केले जाणार आहे.अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार तसेच विभागात अधिकारी-कर्मचारी चांगले कवी साहित्यिक आहेत त्यांचे साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याबाबतही महसूलमंत्र्यांनी सूचित केले आहे.

राज्यात प्रथमच महसूल सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण प्रशासन लोकांपर्यत घेवून जाण्याचा प्रयत्न आहे.नैसर्गिक आपत्तीचे आवाहन समोर असले तरी प्राप्त परिस्थिती लक्षात घेवून सप्ताहातील सर्व उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन करतानाच कार्यालय आणि परीसर स्वच्छता मोहीम,राईट टू सर्व्हीस कायद्याची अंमलबजावणी,सिक्स बंडल रेकाॅर्ड उपक्रम कार्यालयातील सेवेची कार्यप्रणाली या सप्ताहाच्या निमित्ताने तयार करावी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकदिवस दुर्गम भागात मुक्काम करून गावाचे प्रश्न जाणून घेण्याचे आवाहन महसूलमंत्री श्री.विखे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close