पुरस्कार,गौरव
गुन्हेगारांवर धाक असणारे पो.नि.जाधव यांचा सत्कार संपन्न.

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात असामाजिक तत्व व गुन्हेगारांवर धाक निर्माण करणारे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दौलतराव जाधव यांच्या नुकताच कोपरगाव येथील योग प्रचार प्रसार संस्थेच्या वतीने नागरी सत्कार ह.भ.प.गणपत महाराज लोहाटे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला आहे.

पोलीस खात्याची नोकरी म्हणजे सुळावरची पोळी असून इच्छा असूनही कायदा आणि वरिष्ठांच्या धाकामुळे कामात चाकोरी सोडून वागता येत नाही.जबाबदारीचे सतत भान ठेवावे लागते. पोलीस खात्याची नोकरी म्हणजे एक प्रकारे सुळावरची पोळीच असते”-ह.भ.प.गणपत महाराज लोहाटे
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी श्रीगोंदयावरून पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची नियक्ती झाली होती.नाही म्हणायला या पूर्वी त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आपल्या धाकाने असामाजिक तत्वांवर चांगलाच धाक निर्माण केला होता.बहुदा त्यांच्या याच कामाची पावती म्हणून त्यांना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दुसऱ्यांदा नियुक्ती मिळाली म्हटले तर ते वावगे ठरू नये.त्यांनी दुसऱ्यांदा ही जबाबदारी नेटाने पार पाडली आहे.त्यासाठी आपेगाव येथील गत उन्हाळ्यात आपल्या शेतात राहणाऱ्या वृद्ध पतीपत्नीचा झालेला खून व त्याचा त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड व त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत काही दिवसात लावलेला आरोपींचा शोध व त्यांना केलेली अटक हा पुरावा मानता येईल.या शिवाय पढेगाव येथील दुकानफोडी व त्याचा आरोपींसह लागलेला शोध असे अनेक उदाहरणे सांगता येतील. त्यामुळे त्यांच्या कर्तव्यदक्षतेचा होणारा गौरव काही अप्रूप म्हणण्याचे काही कारण नाही.त्याच मुले त्यांचा जनमानसात जसा आदर आहे तसा आपल्या सहकाऱ्यांतही आदर आहे.श्रीगोंदा येथील एका राजकीय हस्तिशी त्यांनी घेतलेला पंगा जगजाहीर आहे.अखेर त्या राजकीय हस्तिस त्यांची माफी मागावी लागली होती.त्यामुळे त्यांचा सत्कार ही निश्चितच गौरवास्पद बाब मानली पाहिजे.त्यामुळे कोपरगाव योग प्रसार संस्थाही कौतुकास पात्र ठरली तर नवल नाही.
सदर प्रसंगी योग संस्थेचे अध्यक्ष व योगशिक्षक दत्ता पुंडे,स्वाध्याय परिवाराचे दिलीप सोनवणे,राजश्री जाधव,शारदा सुरळे,वंदना चिकटे,स्वाती मुळे,सारिका भावसार,सुनिता भावसार,अर्चना लाड,कमल नरोडे,सुनीता भुतडा,उमा वहाडणे,उर्मिला लोळगे,शितल नाईक,गिरीशा कदम,वैशाली दिवेकर,छाया खेमनर,पल्लवी भगत,अनिता दातीर,जोती काटकर,पुष्पा जगताप,ऊषा शिंदे,कल्पना सोनवणे,रत्ना पवार,ज्योत्स्ना धामणे,वर्षा गंगुलेआदी अनेक योगसाधिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
सदर प्रसंगी बोलताना दौलतराव जाधव म्हणाले की,”कोपरगावकरांनी वेळोवेळी माझ्या चांगल्या कामाचे कौतुक केले व मला त्यामुळे नेहमीच प्रेरणा मिळाली प्रोत्साहन मिळाले. नागरिकांचे समाधान झाले की काम करण्यासाठी आम्हा पोलीस कर्मचाऱ्यांना बळ मिळते.कोपरगावकरांचे हे प्रेम आम्ही कधीच विसरणार नसल्याचे शेवटी म्हटले आहे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक दत्ता पुंड यांनी तर सुत्रसंचालन उमा वहाडणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार वंदना चिकटे यांनी मानले आहे.