जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

कोपरगावात…या संगणक अभियंत्याचा गौरव

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव येथिल जेष्ठ विधीज्ञ अॕड.जयंतराव जोशी यांचे चिरंजीव संगणक अभियंता चि.समिरण जयंतराव जोशी यांची अमेरिका येथे युटा प्रांतात साॅल्टलेक (सिटी) शहरातील युटा विद्यापिठात साडेपाच वर्षांचा परम संगणक शिक्षण आणि सेमी कंडक्टर यातील संशोधनासाठी निवड झाल्याबददल त्यांचा कोपरगाव ब्राह्मण सभेच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला आहे.

“संगणक अभियंता समिरण याला त्यांच्या घरातुन आई वडीला गुणवत्तेचा वारसा मिळाला असल्याने त्याने ती परंपरा पुढे सुरु ठेवली व त्या बाबत त्याचे कौतुक केले तेवढे थोडे आहे त्याच्या आगामी वातचालीस शुभेच्छा आहे”-संजय सातभाई,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

चि.समिरण याची अमेरिका येथे युटा प्रांतात साॅल्टलेक शहरातील युटा विद्यापिठात साडेपाच वर्षांचा परम संगणक,सेमी कंडक्टर (हे संगणक नासा/ईस्रो वापरतात) या विषयावर संशोधनासाठी त्याची निवड झाली आहे तो १६ ऑगस्टला समीरण अमेरिकेला रवाना होत आहे या पार्श्वभूमीवर कोपरगाव। ब्राम्हणसभेने त्याचा सत्कार आयोजित केला होता.

सदर प्रसंगी कोपरगाव ब्राह्यण सभेचे अध्यक्ष मकरंद को-हाळकर यांनी प्रास्तविक केले आहे.त्यावेळी त्यांनी,”चि.समिरणची निवडआपल्या सर्वाच्या दृष्टीने खुप अभिमानाची गोष्ट आहे.त्याला या क्षेत्रात काम करायला मिळते ही एक प्रकारची देश सेवा असल्याचे म्हटले आहे.

समिरण जोशी यांने,”हा आपला घरातला सत्कार असल्याने त्याचे माझ्या दृष्टीने महत्व मोठे आहे असे स्पष्ट केले व पुढील वाटचालीत करण्यात येणाऱ्या संशोधना विषयी माहीती दिली.उपस्थितांचे आभार ब्राह्यण सभेचे उपाध्यक्ष बाळकृष्ण कुलकर्णी यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close