जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

कु.गाडे हिची पश्चिम विभागीय विद्यापीठ बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव चेस क्लब ची बुद्धीबळ पटू व के.जे.सोमय्या महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी कु.साक्षी संजीव गाडे हिची पश्चिम विभागीय विद्यापिठ बुद्धीबळ स्पर्धेसाठी पुणे विद्यापीठ संघात निवड झाली आहे तिच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.ती कोपरगावातून प्रथमच मुलींमधून निवड झालेली खेळाडू आहे.

साईबाबा ज्युनिअर कॉलेज,शिर्डी येथे नगर विभाग संघात स्थान मिळविल्यानंतर पिंपरी चिंचवड येथे झालेल्या पुणे विभागीय स्पर्धेतील तिच्या लक्षवेधी कामगीरीमुळे साक्षी हिची पुणे विद्यापीठ संघात निवड झाली होती.

ऑरो विद्यापीठ सुरत येथे पश्चिम विभागीय विद्यापीठ बुध्दीबळ स्पर्धेमध्ये पुणे विभागाच्या बुद्धीबळ संघाचे प्रतिनिधीत्व करित आहे.
कु.साक्षी ही कोपरगाव येथील एस.टी.आगारातील वाहतुक नियंत्रक संजीव गाडे यांची कन्या आहे.ती के जे.सोमय्या महाविद्यालयात टी.वाय.बी कॉम या वर्षात शिकत आहे तसेच सी.ए. चे शिक्षण घेत आहे.यापूर्वीही तिने जिल्हा व राज्यस्तरावरील बुध्दीबळ स्पर्धेत विवीध पारितोषिके मिळविलेली आहे. तिला क्रीडा शिक्षक डॉ.सुनील कुटे,रमेश येवले सर,नितीन सोळके सर,संकेत गाडे यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले आहे.

कु.साक्षी गाडे हिच्या या अभुतपूर्व यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव संजीव दादा कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे,प्राचार्य डॉ.बी.एस.यादव सर,कोपरगाव चेस स्पोर्ट्स क्लबचे सदस्य महेश थोरात,नुपूर संचेती,नितीन जोरी,यश बंब,प्रमोद वाणी व कृष्णराव गाडे ,सुनील गाडे ,किरण गाडे आदिनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close