पुरस्कार,गौरव
…या विद्यार्थ्यांची कोपरगावात गौरव यात्रा निघणार !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.जे.सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थी अक्षय मधुकर आव्हाड याला नुकताच महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील वर्ष २०२१-२२ चा प्रतिष्ठेचा “शिवछत्रपती पुरस्कार” मिळालेला आहे.या लक्षवेधी यशाबद्दल संस्था व महाविद्यालयाच्या वतीने कोपरगांव शहरात त्यांची बुधवार दि.३१ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता गौरव-यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

अक्षय आव्हाड हा महाविद्यालयातील क्रीडा विभागाचा विद्यार्थी असून क्रीडा क्षेत्रातील त्याचे योगदान महत्वाचे आहे.त्याने राष्ट्रीय पातळी वर बेसबॉल स्पर्धेचे नेतृत्व केलेले असून ध्येय,चिकाटी व परिश्रम या त्रिसूत्रीचा प्रयोग करून हे लक्षवेधी यश मिळविलेले आहे.
क्रीडा-क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील गुणवान खेळाडूंना महाराष्ट्र शासनातर्फे दिले जाणारे पुरस्कार. व्यक्तिगत स्वरूपाचे हे पुरस्कार देण्यास १९६९-७० सालापासून प्रारंभ झाला आहे.या पुरस्कार-योजनेचा प्रमुख उद्देश विविध प्रकारच्या खेळांमध्ये सातत्याने चमकणाऱ्या खेळाडूंचे कौतुक करणे आणि नवोदित, होतकरू खेळाडूंना उत्तेजन देणे हा आहे.महाराष्ट्रातील सर्वच खेळांचा दर्जा वाढविणे,हाही त्यामागे एक हेतू आहे.तो पुरस्कार नुकताच अक्षय आव्हाड याने मिळवला असल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अक्षय आव्हाड हा महाविद्यालयातील क्रीडा विभागाचा विद्यार्थी असून क्रीडा क्षेत्रातील त्याचे योगदान महत्वाचे आहे.त्याने राष्ट्रीय पातळी वर बेसबॉल स्पर्धेचे नेतृत्व केलेले असून ध्येय,चिकाटी व परिश्रम या त्रिसूत्रीचा प्रयोग करून हे लक्षवेधी यश मिळविलेले आहे.त्याने पुरस्काराच्या रूपाने मिळविलेल्या लक्षवेधी यशाबद्दल संस्था व महाविद्यालयाच्या वतीने कोपरगांव शहरात त्यांची बुधवार दि.३१ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता गौरव-यात्रा काढण्यात येणार आहे.या यात्रेत विद्यार्थी,पालक,नागरिक आदींनी सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ.यादव यांनी शेवटी केले आहे.