पाणी पुरवठा योजना
…या गावाच्या पाणी योजनेसाठी मोठा निधी-आ.काळेंची माहिती

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदारसंघातील जेऊर कुंभारी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी कमी पडत असलेला अधिकचा निधी मिळावा यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून अधिकच्या ०१ कोटी रुपये निधीस महायुती शासनाने मंजुरी येवून जेऊर कुंभारी पाणी पुरवठा योजनेसाठी नवीन १० कोटी ९१ लक्ष रुपये निधीची सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

जेऊर कुंभारी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ९ कोटी ९२ लाख ३१ हजार रूपये निधीची प्रशासकीय मंजुरी मिळाली होती मात्र निधी कमी पडत असल्याने त्याबाबत मुंबईत निधीसाठी पाठपुरावा सुरू होता त्याला यश आले आहे.याबाबत ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे.
कोपरगाव मतदार संघातील अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी आ.काळे यांनी केलेल्या प्रयत्नातून बहुतांश गावातील पाणी पुरवठा योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत.यामध्ये जेऊर कुंभारी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ९ कोटी ९२ लाख ३१ हजार रूपये निधीची प्रशासकीय मंजुरी मिळून या योजनेचे देखील काम प्रगतीपथावर आहे.परंतु सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेसाठी निधी कमी पडत असल्यामुळे व काही नागरिकांना या पाणी पुरवठा योजनेचा लाभ पोहोचविण्यात निधीची कमतरता भासणार असल्यामुळे या योजनेसाठी अधिकचा निधी मिळावा यासाठी महायुती शासनाकडे आ.काळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता.
त्या पाठपुराव्याची दखल घेवून महायुती शासनाने जेऊर कुंभारी नळ पाणीपुरवठा योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देतांना ०१ कोटी अधिक निधी देवून या योजनेसाठी १० कोटी ९१ लक्ष रुपये निधीची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.त्यामुळे जेऊर कुंभारी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
जेऊर कुंभारी पाणी पुरवठा योजनेसाठी नवीन १० कोटी ९१ लक्ष रुपये निधीची सुधारीत प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल आ.काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे,पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव देवकर यांचे आभार मानले आहे.