जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

पतसंस्थेची कर्ज थकबाकी पोटी दिला धनादेश,न वटल्याने आरोपीस कारावास !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

समता सहकारी पतसंस्थेच्या घेतलेल्या कर्जपोटी दिलेला धनादेश न वाटल्याने दाखल केलेल्या दाव्याची सुनावणी नुकतीच संपन्न झाली असून यात अ,नगर येथील आरोपी कर्जदार अब्दुल दौलत शेख यास येथील मुख्य न्यायाधीश यांनी कलम १३८ नुसार दोषी धरून एक महिना कारावास व ४५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.त्यामुळे नाठाळ कर्जदारांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

या कर्ज थकबाकीदार सुनावणीत न्यायालयाने दोन्ही बाजू सविस्तर ऐकून आरोपी अब्दुल शेख यास दोषी धरून १ महिना कारावास व ४५ हजार रुपये दंड दोन महिन्यांच्या आत समता पतसंस्थेच्या अ,नगर शाखेत फिर्यादी गुंजाळ यांच्याकडे देण्याचा आदेश पारित केला आहे.तसेच दंडाची रक्कम दोन महिन्यात ‘न’ दिल्यास सात दिवसांचा पुन्हा कारावास असा आदेश न्यायालयाने पारित केलेला आहे.त्यामुळे थकबाकीदारात खळबळ उडाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरांतील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या अ,नगर शाखेचे थकित कर्जदार अब्दुल दौलत शेख यांने संस्थेच्या अ,नगर शाखेतुन कर्ज घेतले होते.व त्या थकबाकीपोटी दिलेला धनादेश न वटल्याने त्यांच्या विरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम १३८ अन्वये मुख्य न्यायदंडाधिकारी अ,नगर यांच्या न्यायालयात शाखेचे शाखाधिकारी एन.जी.गुंजाळ यांनी फिर्याद दाखल केली होती.त्यांना समता पतसंस्थेचे वसुली विभागातील कायदेशीर सल्लागार एस.जी.पठारे यांनी सहकार्य आणि कायदेशीर मार्गदर्शन केले होते.त्या दाव्याची सुनावणी बरेच दिवस संपन्न होऊन त्याचा निकाल नुकताच हाती आला आहे.

या सुनावणीत न्यायालयाने दोन्ही बाजू सविस्तर ऐकून आरोपी अब्दुल शेख यास दोषी धरून १ महिना कारावास व ४५ हजार रुपये दंड दोन महिन्यांच्या आत समता पतसंस्थेच्या अ,नगर शाखेत फिर्यादी गुंजाळ यांच्याकडे देण्याचा आदेश पारित केला आहे.तसेच दंडाची रक्कम दोन महिन्यात ‘न’ दिल्यास सात दिवसांचा पुन्हा कारावास असा आदेश न्यायालयाने पारित केलेला आहे.समता पतसंस्थेतर्फे ॲड.वृषाली तांदळे यांनी काम पाहिले.

महाराष्ट्र सहकारी संस्था कलम १०१ व १५६ अन्वये तसेच फौजदारी कायद्याप्रमाणे व निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम १३८ अन्वये थकबाकी वसुली करणे कामी कठोर व कायदेशीर कारवाई थकबाकीदार,कर्जदार व त्यांचे जामिनदार यांचे विरूद्ध केली जात असते.तसेच न्यायालयाच्या या निकालामुळे थकबाकीदार,कर्जदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊन थकित कर्जदार त्याच्याकडील थकबाकी भरणेकामी हालचाली करत असल्याची माहिती विशेष वसुली व विक्री अधिकारी जनार्दन कदम यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close