न्यायिक वृत्त
…’त्या’ गंभीर गुन्ह्यातील आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील काकडी (शिर्डी) विमानतळाला लागून दक्षिण बाजूस असलेल्या भोसले वस्तीवर ५ एप्रिल रोजी पहाटे झालेल्या हल्ल्यातील आरोपी नगर पोलिसांनी जेरबंद करून त्यांना नुकतेच कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांचेसमोर हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्या.स्मिता बनसोड यांनी आरोपी संदीप दहाबाड व जगन काशिनाथ किरकिरे चौकी.रा.तेलीम्बर पाडा,मोखाडा यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

दरम्यान या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांनी संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त केले असल्याची त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही जाणीव दिसून येत नव्हती.त्यामुळे त्यांचे वर्तन एखाद्या सराईत गुन्हेगारासारखे असल्याचे दिसत होते.त्यामुळे हे दोन्ही गुन्हेगारांनी आणखी गुन्हे केले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मात्र पोलीसांनी त्यास दुजोरा दिला नाही.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील काकडी विमानतळाच्या दक्षिण बाजूस असलेल्या भोसले वस्तीवर दिनांक ०५ एप्रिल २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास काही चोरट्यांनी पाळत ठेऊन मयत साहेबराव पोपट भोसले यांच्या वस्तीवर सशस्त्र हल्ला चढवला होता.त्यात ते स्वतः सह त्यांचा मुलगा कृष्णा साहेबराव भोसले (वय ३२) हे जागीच ठार झाले असल्याचे दिसून आले आहे.तर त्यांची पत्नी साखरबाई भोसले या गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत.तर त्यांची वृद्ध,अंध आई आश्चर्यकारक बचावल्या होत्या.या घटनेने नगरसह राज्यात सर्वत्र खळबळ उडाली होती.ही बाब दूध घालण्यास वेळेवर येणारे भोसले कुटुंब आज का आले नाही याचा शोध घेतल्यावर दूध संस्थाचालक यांचेकडून उघड झाली होती.त्यामुळे नगर पोलिसांचे चांगलेच धाबे दणाणले होते.त्यामुळे घटनास्थळी पोलिस अधीक्षक राकेश ओला,श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे,शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने,राहाता पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण आदींनी घटनास्थळी तातडीने हालचाल केली होती व आरोपींचा शोध सुरू केला होता.त्यावेळी सिन्नर तालुक्यातील पळसे येथील टोल नाक्याजवळ घटनास्थळावरून बजाज प्लॅटिना या चोरून नेलेल्या दुचाकीने फरार होत असताना त्यांना बारा तासांच्या आत अटक केली होती.

दरम्यान नागरिकांच्या जीविताची आणि वित्तास संरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असताना यात बाप साहेबराव भोसले आणि त्यांचा अविवाहित मुलगा कृष्णा भोसले या दोन जणांचा बळी गेला आहे.त्यांच्या जिविताचे संरक्षण करण्यास पोलिस यंत्रणा अपयशी ठरली असल्याने सदर कुटुंबास भरपाई देणे गरजेचे असताना त्या पातळीवर शुकशुकाट दिसत आहे.
दरम्यान आरोपींना मागील रविवारी त्यांना न्या.स्मिता बनसोड यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.ती काल ११ एप्रिल संपली होती.त्यानंतर त्यांना शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांनी कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पंडित यांचे समोर हजर केले होते.त्यावेळी गंभीर गुन्ह्यातील दोन्ही आरोपी अटक केले असून त्यांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत केले असल्याने आरोपींना न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी आरोपींचे मोखाडा येथील वकील श्री शिंदे यांनी केली होती.सरकारी अभियोक्ता प्रदीप रणधीर यांनी आपला जोरदार युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
दरम्यान या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांनी संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त केले असल्याची त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही जाणीव दिसून येत नव्हती.त्यामुळे त्यांचे वर्तन एखाद्या सराईत गुन्हेगारासारखे असल्याचे दिसत होते.त्यामुळे हे दोन्ही गुन्हेगारांनी आणखी गुन्हे केले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मात्र पोलिस अधिकारी मात्र त्यांचेवर किरकोळ स्वरूपाचे दोन गुन्हे असल्याचे सांगत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान नागरिकांच्या जीविताची आणि वित्तास संरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असताना यात बाप साहेबराव भोसले आणि त्यांचा अविवाहित मुलगा कृष्णा भोसले या दोन जणांचा बळी गेला आहे.त्यांच्या जिविताचे संरक्षण करण्यास राहाता तालुका पोलिस अपयशी ठरले असल्याचे या कुटुंबास भरपाई देणे गरजेचे असताना प्रशासन पातळीवर मात्र शुकशुकाट दिसत असल्याने काकडी येथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि जनतेचे जीवित हे तृणवत झाले असल्याचे दिसून येत असल्याची टीका केली आहे.