जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

खुनाच्या गुन्ह्यात नऊ आरोपींना जन्मठेप,…या जिल्हा न्यायालयाचा निर्णय

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

राहाता तालुक्यातील मौजे लोहगाव हद्दीत शेतीच्या वादातून उद्भवलेल्या हाणामारीत गौरव कडू यांचा लोखंडी रॉड व कुदळीच्या सहाय्याने मृत्यू झाल्या प्रकरणी अमोल नेहे,किशोर नेहे,वसंत नेहे,सुरेश नेहे,सचिन नेहे,प्रसाद नेहे,आकाश नेहे,मयूर नेहे,व जगन्नाथ पांडगळे आदी नऊ आरोपींना कोपरंगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असल्याची खळबळजनक माहिती सरकारी अभियोक्ता यांनी दिली आहे.

लोहगाव येथील या गुन्ह्यातील सरकारी अभियोक्ता शरद गुजर यांचा युक्तिवाद महत्वाचा ग्राह्य धरला असून जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रं.०२ बी.एम.पाटील यांनी अमोल नेहे,किशोर नेहेसह नऊ आरोपींना भा.द.वि.कलम ३०२,३०७,१४८,१४९ अनव्ये दोषी धरून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”राहाता तालुक्यातील लोहगाव येथे सन-२०२१ साली शेतीच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती.त्यात आरोपी अमोल नेहे,किशोर नेहे,वसंत नेहे,सुरेश नेहे,सचिन नेहे,प्रसाद नेहे,आकाश नेहे,मयूर नेहे,व जगन्नाथ पांडगळे आदी नऊ आरोपींनीं गौरव अनिल कडू यांचे डोक्यात कुदळ व लोखंडी रॉडच्या सहाय्याने जीवे मारण्याचे उद्देशाने गंभीर मारहाण केली होती.त्यात गौरव कडू यांचा मृत्यू झाला होता.

कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालय.

दरम्यान या प्रकरणी लोणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.०१/२०२१ भा.द.वि.कलम ३०२,३०७,१४३,१४७,१४८,१४९,५०४,५०६ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.सदर गुन्ह्याचा तपास लोणी पोलीस अधिकारी करत होते.सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात नऊ आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल झाले होते.

    सदर खटल्यात सरकार तर्फे सरकारी अभियोक्ता शरद गुजर यांनी काम पाहिले होते.त्यात एकूण अकरा महत्वाचे साक्षिदार तपासले होते.त्यात फिर्यादी,प्रत्यक्षदर्शी साक्षिदार स्थळ पंचनामा,जप्ती पंच,शव विच्छेदन अहवाल,तपासी अधिकारी यांचे जबाब नोंदवले गेले होते.यात सर्वाधिक महत्वाची साक्ष ठरली ती प्रत्यक्षदर्शी यांची.

    यातील सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद महत्वाचा ग्राह्य धरला असून जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रं.०२ बी.एम.पाटील यांनी सर्व नऊ आरोपींना भा.द.वि.कलम ३०२,३०७,१४८,१४९ अनव्ये दोषी धरून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.तसेच ०१ लाख ८० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.त्या दंडातील राकमेपैकी मयताच्या कुटुंबास ०१ लाख ५० हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

   सदर प्रकरणी लोणी येथील पैरवी अधिकारी लोणी येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार नारायण एस.माळी यांनी कामकाजात सहकार्य केले असल्याची माहिती सरकारी अभियोक्ता एस.एम.गुजर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.या निकालाचे लोणी आणि परिसरातील नागरिकांनी स्वागत केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close