न्यायिक वृत्त
…’त्या’ आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहारानजीक कोपरगाव-येवला रोडवर असलेल्या ‘हॉटेल कल्पतरू’ या ठिकाणी राजरोस वेश्या व्यवसाय केल्या प्रकरणातील आरोपी विजय सोपान मवाळ यास नुकतेच शहर पोलिसांनी अटक करून कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती हाती आली आहे.
आरोपी विजय मवाळ यास आज कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी कोपरगाव जिल्हा आणि सत्र न्यायालय क्रं.एक समोर हजर केले होते.त्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी शिर्डी नंतर कोपरगाव येथील उच्च वर्गीय वेश्या व्यवसाय उघड करून अवैध व्यवसाय करणाऱ्यांना मोठी चपराक दिली आहे.त्यात आरोपीने आपल्या ‘हॉटेल कल्पतरु’ याचा वापर करून त्या ठिकाणी खोल्या उपलब्ध करून देऊन वेश्या व्यवसायाला रान मोकळे करून दिले असल्याचे उघड झाले होते.त्याची गुप्त खबर वरिष्ठ पोलिस अधिकारी संदीप मिटके यांना लागल्यावर त्यांनी त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून त्या ठिकाणीच पर्दाफाश केला आहे.त्यात एका शेजारच्या जिल्ह्यातील तर अन्य एक पश्चिम बंगाल मधील अशा दोन तरुणींना जेरबंद केले होते.त्यामुळे कोपरगाव शहरासह तालुक्यात खळबळ उडाली होती.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी सुनंदा विजय धराडे यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं.३८५/२०२३ स्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम ३,४,५,७,८ प्रमाणे आरोपी मवाळ याचे विरुद्ध काल गुन्हा दाखल केला होता.त्याचे कडील दोन मुली यातील एक छ.संभाजीनगर येथील एक (वय-२६)व एक पश्चिम बंगाल येथील एक (वय-२३)अशा दोन तरुणी वर कारवाई केली होती.त्यांचेकडील मोबाईल,सिमकार्ड,रोख रक्कमेसह ४० हजार ३८० रुपयांचे काही आक्षेपार्ह साहित्य जप्त केलं होते.त्यास कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी कोपरगाव जिल्हा आणि सत्र न्यायालय क्रं.एक समोर हजर केले होते.त्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी पुढील तपास शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी मिटके यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख हे करत आहेत.