जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

आत्मा मालिकमध्ये शिक्षक दिना निमित्त शिक्षकांचा केला सन्मान

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगांव ( प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्यातील विश्‍वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील विविध विभागामध्ये डॉ. सर्वेपल्ली राधाकृष्णन् यांची जयंती व शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.विश्‍वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट व ओम गुरूदेव नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे.

यावेळी आश्रमाचे संत निजानंद महाराज, संत जितेंद्रानंद महाराज, संत चंद्रानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्‍वस्त वसंतराव आव्हाड, प्रभाकर जमधडे, प्रकाश भट, पतसंस्थेचे व्यवस्थापक शामराव नाईकवाडे, प्राचार्य कांतीलाल पटेल, निरंजन डांगे, माणिक जाधव,प्राचार्य सुधाकर मलिक, संदिप गायकवाड, योगेश पुंड, दिनकर राऊत, नितीन सोनवणे, योगेश गायके, नवनाथ चौधरी, नागेश यादव आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विश्‍वस्त विठ्ठलराव होन यांनी शिक्षकांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. आत्मा मालिक संकुलाचे नाव लोकिकात शिक्षकांच्या मौलिक वाटा आहे. या संकुलाचे नाव असेच वृद्घिंगत व्हावे यासाठी त्यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
संत निजानंद महाराज यांनी प.पू. सद्गुरु माऊलींचा शैक्षणिक कार्याचा उद्देश सांगितला. विद्यार्थी दशेतच शिक्षणाबरोबरच मुलांना आत्मस्वरुपाची ओळख व्हावी यासाठी शैक्षणिक कार्य सुरु असून शिक्षक अत्यंत चोखपणे हे कर्तव्य बजावत असल्याचे यावेळी ते म्हणाले.
तसेच अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी म्हटले की, आजच्या काळात शिक्षणाचे स्वरुप बदलत चालले आहे. गुरुकूल पद्घतीने सुरु झालेले शिक्षण दूरशिक्षण, संकेतस्थळ, विविध ऍप्लिकेशन अशा अनेक माध्यमातून मिळत आहे. पण तरीदेखील आजही शिक्षकाशिवाय शिक्षण हे होवून शकत नाही आणि भविष्यात होणार नाही. म्हणूनच शिक्षकांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. शिक्षक ज्ञानदानाचे प्रमुख कार्य करत असतात. त्यांच्यामुळेच प्रत्येक व्यक्ती जीवनात यशस्वी झाला आहे. आज या शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांप्रती ऋण व्यक्त करण्याची संधी मिळाली अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.
शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वेपल्ली राधाकृष्णन् यांची जयंती सर्व विभाागा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. इ. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत काम करुन प्रत्यक्ष शिक्षक होण्याची अनुभूती मिळविली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close