जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

…या सहकारी बँकेच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सहकारी बँकींग क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणा-या कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील गौतम सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुधाकर वामनराव दंडवते व उपाध्यक्षपदी बापूराव दगुराव जावळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

गौतम सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या नावाची सूचना राजेंद्र ढोमसे यांनी मांडली होती त्यास सूचनेला बाबुराव थोरात यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्ष पदासाठीची सूचना विजय रक्ताटे यांनी मांडली सदर सूचनेला कमलाकर चांदगुडे यांनी अनुमोदन दिले होते.निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन्ही पदाधिकारी बिनविरोध जाहीर केले आहे.

कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली गौतम सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची २०२३-२८ साठीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली आहे.त्यावेळी गौतम बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कोपरगावचे नामदेव ठोंबळ यांच्या उपस्थितीत पार पडली आहे.

सदर प्रसंगी अध्यक्षपदाच्या नावाची सूचना राजेंद्र ढोमसे यांनी मांडली होती त्यास सूचनेला बाबुराव थोरात यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्ष पदासाठीची सूचना विजय रक्ताटे यांनी मांडली सदर सूचनेला कमलाकर चांदगुडे यांनी अनुमोदन दिले होते.

दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे अध्यक्षीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी बँकेच्या अध्यक्षपदी सुधाकर दंडवते व उपाध्यक्षपदी बापूराव जावळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.निवडणूक कामी आर.एन.रहाणे यांनी सहकार्य केले आहे.

यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे माजी आ.अशोक काळे व आ.आशुतोष काळे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.
सदर प्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे,प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड व वरिष्ठ अधिकारी नानासाहेब बनसोडे यांनी अभिनंदन केले आहे.

गौतम बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष दंडवते व उपाध्यक्ष जावळे यांचा सत्कार करतांना माजी आ.अशोक काळे व आ.आशुतोष काळे समवेत निवडणूक अधिकारी नामदेव ठोंबळ,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे,प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close