जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

प्रदेश प्रवक्ते पदावर नगर जिल्ह्यातील…या पत्रकाराची निवड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
मुंबई-(प्रतिनिधी)

नगर जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार ताराचंद म्हस्के यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे “प्रदेश प्रवक्ता” या पदावर नियुक्ती केल्याचे पक्षातर्फे जाहीर करण्यात आले असून नियुक्तीचे पत्र पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी त्यांना प्रदान केले आहे.

“जेष्ठ पत्रकार ताराचंद म्हस्के यांचा पत्रकारिता क्षेत्रातील मोठा अनुभव पक्षासाठी प्रदेश प्रवक्ता म्हणून भूमिका मांडतांना नक्कीच लाभदायक ठरेल तसेच नव्या पदाची जबादारी ते चांगल्या प्रकारे पार पाडतील”-आ.जयंत पाटील,प्रदेशाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस.

ताराचंद म्हस्के पाटील यांनी ३७ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात काम केलेले असून याकाळात त्यांचा विविध राजकीय नेत्यांशी जवळून संबंध आला मात्र कृषी,शिक्षण,सहकार,ग्रामीण विकास,क्रीडा,राजकारण,शेतकरी,कामगार,या सर्वच क्षेत्रात भरीव योगदान असलेले ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या विचारांचा व नेतृत्वाचा प्रभाव पडल्याने ताराचंद म्हस्के पाटील यांनी खा.पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित मुंबई येथे पक्ष मुख्यालयात ताराचंद म्हस्के यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला होता.

पत्रकारिता क्षेत्रातील दीर्घकाळ अनुभव लक्षात घेता ताराचंद म्हस्के पाटील यांची ‘प्रदेश प्रवक्ता’ या पदावर नियुक्ती केली असून त्याची जबादारी योग्य प्रकारे पार पाडतील असा विश्वास व्यक्त करून करून अजित पवार यांनी ताराचंद म्हस्के पाटील यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

ताराचंद म्हस्के पाटील यांचा पत्रकारिता क्षेत्रातील मोठा अनुभव पक्षासाठी प्रदेश प्रवक्ता म्हणून भूमिका मांडतांना नक्कीच लाभदायक ठरेल तसेच नव्या पदाची जबादारी ते चांगल्या प्रकारे पार पाडतील असा विश्वास यावेळी प्रदेश अध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री दिलीप वळसे,खा.सुप्रिया सुळे यांनीही ताराचंद म्हस्के यांचे अभिनंद करून शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close