जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

…या विकास सोसायटीच्या अध्यक्षपदाची निवड संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील चांदगव्हाण येथील पद्मावती विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी काळे गटाचे नानासाहेब म्हाळू बाचकर व उपाध्यक्षपदी आप्पासाहेब पांडुरंग बाचकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सोसायटीच्या नूतन पदाची निवडणूक नुकतीच निवडणूक अधिकारी डी.ए.सावंत यांच्या उपस्थितीत पार पडली आहे.या निवडणुकीत चेअरमनपदासाठी नानासाहेब म्हाळू बाचकर यांच्या नावाची सूचना रवींद्र बाचकर यांनी मांडली त्या सुचनेस आण्णा शिंदे यांनी अनुमोदन दिले.उपाध्यक्ष पदासाठी आप्पासाहेब पांडुरंग बाचकर यांच्या नावाची सूचना शिवाजी पांडुरंग बाचकर यांनी मांडली त्यास गोरक्षनाथ बाचकर यांनी अनुमोदन दिले.

पद्मावती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली असून या निवडणुकीत सर्वच्या सर्व १२ जागा काळे गटाच्या निवडून आल्या आहेत.निवडून आलेले सदस्य पुढीलप्रमाणे नानासाहेब म्हाळू बाचकर,आप्पासाहेब पांडुरंग बाचकर,विक्रम म्हाळु बाचकर,शिवाजी पांडुरंग बाचकर,रवींद्र विक्रम बाचकर,गोरक्षनाथ पांडुरंग बाचकर,बाळासाहेब पांडुरंग बाचकर,राहुल शिवाजी बाचकर,आण्णा बुवाजी शिंदे, रामदास गंगाधर बर्डे,श्रीमती मीनाताई विक्रम बाचकर,श्रीमती अलका शिवाजी बाचकर हे काळे गटाचे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

सोसायटीच्या नूतन पदाची निवडणूक नुकतीच निवडणूक अधिकारी डी.ए.सावंत यांच्या उपस्थितीत पार पडली आहे.या निवडणुकीत चेअरमनपदासाठी नानासाहेब म्हाळू बाचकर यांच्या नावाची सूचना रवींद्र बाचकर यांनी मांडली त्या सुचनेस आण्णा शिंदे यांनी अनुमोदन दिले.उपाध्यक्ष पदासाठी आप्पासाहेब पांडुरंग बाचकर यांच्या नावाची सूचना शिवाजी पांडुरंग बाचकर यांनी मांडली त्यास गोरक्षनाथ बाचकर यांनी अनुमोदन दिले.दोन्ही पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक अधिकारी डी.ए.सावंत यांनी अध्यक्षपदी नानासाहेब म्हाळू बाचकर व उपाध्यपक्षपदी आप्पासाहेब पांडुरंग बाचकर यांची बिनविरोध निवड जाहीर केली आहे.
यावेळी सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित पदाधिकऱ्यांचे यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले.निवडणूक कामी सचिव संदीप चौधरी यांनी सहकार्य केले.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे माजी आ.अशोक काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close