निवड
शेतकरी संघटनेला…या गावाने दिला प्रामाणिक भूमिपुत्र !
न्युजसेवा
नेवासा -(नरेंद्र काळे)
निळवंडे कालवा कृती समितीने आज पर्यंत पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या मार्गदर्शनात प्रमाणिक काम करून शेतकऱ्यांना निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्रात आणून दिले असून त्यांनी आज पर्यंत आपल्या निर्भिड लेखणीतून अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत.जवळके गावाने आम्हाला एक प्रामाणिक भूमिपुत्र दिला असून ते शेतकरी संघटनेत नक्कीच चांगले स्थान निर्माण करून आमच्यासोबत काम करून शेतकऱ्यांना आगामी काळात न्याय देतील असा विश्वास शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी जवळके येथे एका कार्यक्रमात खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा जवळके येथील विविध स्पर्धा परीक्षेत निवड झालेली भारत टॅलेंट सर्च परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांसाठी विशेष कष्ट घेणाऱ्या शिक्षकांचा ‘आदर्श शिक्षक’ हा पुरस्कार देऊन आणि त्या परीक्षांत विशेष श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थांचा ‘गुणगौरव सोहळा’ जवळके हनुमान मंदिर सभागृहात खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला त्यावेळी त्या बोलत होते.त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रूपेंद्र काळे,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,कालवा समितीचे कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,ज्येष्ठ उपअभियंता एस.के.थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,सरपंच सारिका विजय थोरात,बाळासाहेब थोरात,दत्तात्रय थोरात,माजी उपसरपंच डी.के.थोरात,अण्णासाहेब भोसले,विजय थोरात,समितीचे संघटक नानासाहेब गाढवे,सहसंघटक उत्तमराव जोंधळे,नरेंद्र काळे,गोदरेज कंपनीचे उपव्यवस्थापक अमोल थोरात,माजी उपसरपंच विजय थोरात,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,वनिता रखमा वाकचौरे,इंदुताई नवनाथ शिंदे,मीनाताई विठ्ठल थोरात,सौर ऊर्जा प्रकल्पाचे मार्गदर्शक अधिकारी कैलास कांबळे,संभाजीनगर येथील सौर ऊर्जा कंपनीचे संचालक अजय गोर्डे,भाऊसाहेब गव्हाणे,रंगनाथ गव्हाणे,ज्ञानेश्वर शिंदे,तानाजी शिंदे,उत्तमराव घोरपडे,विजय शिंदे,आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना ऍड .काळे म्हणाले की,”जवळके हे गाव दुष्काळी असूनही येतील भूमिपुत्र स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगत आहे हे पाहून आनंद झाला आहे.त्यांनी आज पर्यंत सन -१९८१ लां पहिले आंदोलन करून सामाजिक जीवनास सुरुवात केली होती.ते १९९२ ला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झाली होती.सन -१९९७ साली पत्रकारितेस सुरुवात केली होती.कोपरगाव तालुक्यातील दुष्काळी १३ गावांना वरदान ठरणाऱ्या उजनी उर्फ रांजणगाव देशमुख उपसा सिंचन योजनेच्या आंदोलनात महत्वपूर्ण योगदान युती शासनाच्या काळात १९९७ त्यास मंजुरी मिळवली होती.स्थानिक नेत्यांचा विरोध हाणून पाडला होता.दरम्यान जवळके ग्रामपंचायत मध्ये स्वतंत्र गट स्थापन करून विना पैसे प्रस्थापितांच्या विरुद्ध बहुमताने विजय मिळवला होता.त्यातून त्यांनी जवळके ग्रामपंचायतच्या मनाध्यमातून ०१ लाखाहून अधिक वृक्ष लागवड त्याबाबत मोहन धारिया यांच्या हस्ते पंचायतीस पुरस्कार प्राप्त केला,संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार,लोकराज्य ग्राम पुरस्कार,क्षयरोग निर्मूलना बाबत जिल्हास्तरीय पुरस्कार मिळवून दिला आहे.जवळके येथे आठवडे बाजार सुरू करून आणि परिसरातील गावात विविध विकास कामे केली आहे.
त्यांनी नगर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची स्थापना करून दहा वर्ष कार्याध्यक्ष,सहा वर्ष जिल्हाध्यक्ष पद भूषवले.शिर्डीत नानासाहेब जवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत तीन राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न झाले आहे.त्यांना सन -२००२ साली गावकरी या प्रसिद्ध वर्तमानपत्राचा मुक्त विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.साबळे यांच्या हस्ते ग्रामीण पत्रकार हा नाशिक येथे गौरव पुरस्कार देऊन गौरवलं आहे.२००९ साली अकोले येथे सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाला होता.सन -२०१० साली एम.आय.टी.पुणे येथे काकडी (शिर्डी )विमानतळ उभारणीसाठी महत्वपूर्ण योगदाना दिल्याबद्दल मनसे चे प्रदेशाध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देऊन गौरव केला होता.कोपरगाव तालुक्यातील येसगाव पाट येथील गावात अवैध वेश्या व्यवसाय बंद करण्यासाठी सातत्याने लेख लिहून अखेर बंद पाडला तालुक्यातील अनेक महिला आणि तरुणांना दिलासा दिला आहे.त्याबद्दल राहुरी येथील महात्मा फुले सामाजिक संस्थेकडून राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाला होता.उत्तर नगर जिल्ह्यातील शिर्डी विमानतळ उभारणीत महत्वपूर्ण योगदान देत आद्य प्रवर्तक म्हणून लौकिक मिळवला आहे.उत्तर नगर व नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी गत १८ वर्षापासून सतत आंदोलन करून लाठ्या-काठ्या अंगावर झेलून संघर्ष केला व हा विषय देश व राज्य पातळीवर चर्चेत आणला होता,उच्च न्यायालय संभाजीनगर येथील शेतकरी संघटनेच्या सहकार्याने उच्च व सर्वोच्च न्यायालयात लढा दिला आहे.निळवंडे लाभक्षेत्राच्या बाहेर असलेल्या राहाता व कोपरगाव तालुक्यातील शिर्डी,कोपरगाव शहरास अवैध पिण्याचे पाणी शहरात नेण्यासाठीचे उत्तर नगर जिल्ह्यातील नेत्यांचे राजकीय षडयंत्र निळवंडे कालवा कृती समितीच्या माध्यमातून हाणून पाडले आहे.सन-२०२४ साली दिनांक ०५ जानेवारी रोजी सह्याद्रीच्या घाट माथ्यावरील ९० टी.एम.सी.पाणी पूर्वेस मिळविण्यासाठी ऍड.अजित काळे यांच्या महत्वपूर्ण सहाय्यातून जनहित याचिका (क्र.५/२०२४) दाखल,परिणामी राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर विषय आणण्यात यश मिळाले आहे.आगामी काळात या याचिकेच्या माध्यमातून त्यास लवकरच यश मिळणार आहे.कोपरगाव शहराची प्रस्थापित नेत्यांनी दिवसाढवळ्या केलेली पाणी चोरी उघड करून त्यावर सातत्याने लेखन करून जनजागृती करून पाच क्रमांकाचा साठवण तलाव बांधण्यास भाग पाडले आहे.त्यांनी समाजातील अनिष्ट प्रथांवर कडाडून हल्ला करून अनेक भोंदू बाबा व राजकीय नेत्यांचे वस्त्रहरण करण्यात यश मिळवले असून आगामी काळात जवळके गावाने आम्हाला पुरस्कार नाही तर एक हिरा दिलेला असून सिफाचे व शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील,कार्याध्यक्ष कालिदास आपेट,क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखीले आम्ही मिळून नक्कीच आगामी काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी कामे करून असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.
सदर प्रसंगी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी,”निळवंडे कालवा कृती समितीने या पूर्वी निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्रात आणण्यासाठी दिल्ली पासून मुंबई पर्यंत मोठे प्रयत्न केले,लाठ्याकाठ्या खाल्ल्या आहे.त्याचे आपण साक्षीदार असून केंद्रीय जलआयोगाकडून आमच्या सहकार्याने त्यांनी सतरा पैकी चौदा मान्यता या प्रकल्पास आणल्या आहेत व उर्वरित त्यांनी ऍड.अजित काळे यांच्या सहकार्याने उच्च न्यायालयातून मिळवून अखंड प्रयत्न केले त्यामुळे या लाभक्षेत्रात आज पाणी खेळू लागले आहे हे त्यांचे निर्विवाद पत्रकार नानासाहेब जवरे व त्याच्या सहकाऱ्यांचे आहे.काहींना निळवंडे धरणाचे नाव उच्चारता येत नाही ज्यांचा काही संबंध नाही अशी काही लोक याचे श्रेय घेत आहे हे दुर्दैव आहे.
निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे यांना नुकताच शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड.अजित काळे यांच्या उपस्थितीत शेतकरी संघटनेत प्रवेश दिला असल्याचे जाहीर करून त्यांना राज्याच्या प्रदेश प्रसिध्दी प्रमुखपदी नियुक्ती दिली आहे व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.पत्रकार जवरे यांना केंद्रीय सीफाचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील,कार्याध्यक्ष कालिदास आपेट,क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखीले आदींनी स्वागत केले आहे.