जाहिरात-9423439946
निवड

पंढरपुरात…या महाराजांचा गौरव,सर्वत्र कौतुक 

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे सध्या सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात व ह.भ.प.रामभाऊ महाराज लबडे पुण्यतिथी सोहळ्यामध्ये मंहत ह.भ.प.संजय महाराज जगताप यांचा प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.उद्धव महाराज नेवासेकर नामदेव महाराज लबडे पंढरपूरकर यांनी नुकताच श्री पांडुरंगाची प्रतिमा,भजनानंद पुस्तक व शाल,श्रीफळ,देऊन सत्कार केला आहे त्या बाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  

ह.भ.प.रामभाऊ महाराज लबडे पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे सध्या सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात श्रीक्षेत्र अंबाबाई मैदान,पंढरपूर येथे ह.भ.प.संजय जगताप महाराज यांचा उद्धव महाराज व नामदेव महाराज लबडे पंढरपूरकर यांनी सत्कार करत सन्मान केला आहे.

ह.भ.प.संजय महाराज जगताप यांनी धार्मिक व अध्यात्मिक प्रचार,प्रसाराचे मोठे कार्य केले आहे व वर्तमानात सुरु आहे.महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार,प्रवचनकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत.विविध ठिकाणी राज्यभर त्यांचे कीर्तन,प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम सातत्याने सुरू असतात.

अध्यात्मिक ज्ञान संपन्न व आपल्या मधुर वाणीने भाविकांना मंत्रमुग्ध करणारे संजय जगताप महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच येवला तालुक्यातील अंदरसुल येथे अखंड हरिनाम सप्ताह व किर्तन महोत्सव सोहळा यशस्वीपणे संपन्न झाला आहे.व असे धार्मिक कार्य त्यांचे सातत्याने सुरू असते.त्यांचे हे धार्मिक,अध्यात्मिक कार्य पाहून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे सध्या सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये व ह.भ.प.रामभाऊ महाराज लबडे पुण्यतिथी सोहळ्याच्या ठिकाणी श्रीक्षेत्र अंबाबाई मैदान,चंद्रभागातीरी,पंढरपूर येथे ह.भ.प.संजय जगताप महाराज यांचा उद्धव महाराज नेवासेकर व नामदेव महाराज लबडे पंढरपूरकर यांनी सत्कार करत त्यांचा सन्मान केला आहे.

   श्री.क्षेत्र पंढरपूर येथे या महान कीर्तनकार विभूतींनी आपला जो सन्मान,सत्कार केला.त्यामुळे आपणास आणखी अध्यात्मिक ऊर्जा मिळाली असून त्यामुळे यापुढेही आपणास धर्मिक कार्य करण्यासाठी मोठी प्रेरणा त्यातून मिळणार आहे असे यावेळी संजय महाराज जगताप यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close