निवडणूक
कोपरगाव तालुक्यातील…या बँकेची निवडणूक बिनविरोध

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या गौतम सहकारी बँकेची २०२३-२८ साठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली उद्योग समूहाच्या इतर संस्थांच्या निवडणुकीप्रमाणे बिनविरोध पार पडली आहे.नूतन संचालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक कर्मवीर शंकरराव काळे यांनी कारखाना व परिसरातील छोट्या मोठ्या व्यावसिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी गौतम सहकारी बँकेची स्थापना केली होती.त्या बँकेची निवडणूक सातत्याने बिनविरोध होत आहे.नूतन संचालकांचे राष्ट्रवादीत सर्वत्र अभिनंदन होत आहे.
गौतम बँकेच्या २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी होणारी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूकीत संचालक पदासाठी निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत एकूण १३ जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण १३ जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी नामदेवराव ठोंबळ यांनी अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले आहे.
बिनविरोध निवडून आलेले सदस्य पुढीलप्रमाणे सुधाकर वामनराव दंडवते,विजय यादवराव रक्ताटे,रुपाली जालिंदर संवत्सरकर,सिंधुबाई रायभान रोहोम,राजेंद्र माणिकराव ढोमसे,कमलाकर रावसाहेब चांदगुडे,बाबुराव थोरात,तुकाराम एकनाथ हुळेकर,श्रीकांत विठ्ठल तिरसे,बापूसाहेब सीताराम वक्ते,उत्तम बन्सी भालेराव,बापूराव दगू जावळे,सुनिल भास्कर डोंगरे या सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.